Download App

Priyanka Chopra Birthday: लग्नाअगोदर ‘या’ कलाकारांसोबत जोडलं गेलं ‘देसी गर्लचं’ नाव!

Happy Birthday Priyanka Chopra: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्री गाजवल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये (Hollywood) देखील आपला जलवा दाखवणारी, तसेच देसी गर्ल (Desi Girl) अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Birthday) आज (१८ जुलै) तिचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. देसी गर्लने सनी देओलच्या (Sunny Deol) ‘द हीरो’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमातून देसी गर्लने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली  होती.


‘व्हॉट्स युअर राशी’ फेम अभिनेता हरमन बावेजा (Harman Baveja) आणि देसी गर्ल जवळपास ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. तसेच हरमनबरोबर रिलेशनशिपमध्ये (Relationship) असताना देसी गर्लने एक नाहीतर सलग ३ सिनेमे फ्लॉप करण्यात आले होते. त्यानंतर मात्र दोघांनी ब्रेकअप केल्याचे समोर आले होते. त्यानंतर खिलाडी म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार आणि देसी गर्लने अनेक बॉलिवूड सिनेमामध्ये एकत्र दिसून आल्याचे पाहायला मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघे पुन्हा एकत्र काम करत असताना एकमेकांच्या जवळ आले होते. परंतु या दोघांनी ही गोष्ट कधीच जाहीरपणे मान्य केल्याचे दिसून आले नाहीत. परंतु त्यांच्या या दोघांच्या नात्याबद्दल सगळ्यांना चाहूल होती.

परंतु प्रोफेशनल लाईफपेक्षा देशी देसी ह कायम तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत येत असते. हॉलिवूड स्टार निक जोनासबरोबर (Star Nick Jonas) लग्न करण्याच्या अगोदर देसी गर्लचे नाव इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते. देसी गर्लने तिच्या मॉडेलिंगच्या कालावधीत बॉलिवूड अभिनेता असीम मर्चंटला (Aseem Merchant) डेट करत असल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर देसी गर्लने बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळताच तिने असीमबरोबर ब्रेकअप केल्याचे समोर आले होते.

किंग खान आणि देसी गर्लने देखील एकेकाळी बी-टाऊनमध्ये चर्चेचा भाग बनली होती. दोघे एकमेकांच्या जवळ आल्याच्या चर्चेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. परंतु या अफवांनंतर किंग खान आणि देसी गर्ल कोणत्याही सिनेमात एकत्र दिसून आले नाहीत. देसी गर्ल आणि शाहिद कपूर यांच्या लिंकअपच्या देखील बातम्या गेल्या काही काळात चांगलंच चर्चेत आल्या होत्या.

दोघे देखील काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जाते. परंतु हे नाते फार काळ टिकले नसल्याचे समोर आले होते. देसी गर्लने पुढे स्कॉटिश अभिनेता जेरार्ड बटलर याला तिच्या मुंबईमधील घरी बोलावले होते. यानंतर दोघे देखील एकत्र असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. तसेच पुढे एमी अवॉर्ड्सच्या दरम्यान देखील देसी गर्लने आणि टॉम हिडलस्टन एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल असल्याचे देखील दिसून आले होते.

…म्हणून चिन्मय मांडलेकर म्हणतोय, उद्या मिळणार एक आनंदाची बातमी!

त्याच दरम्यान दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चांगलीच चर्चा पसरू लागली होती. परंतु लवकरच या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला होता. देसी गर्लने अखेर निक जोनासबरोबर प्रेम खरे मिळाले आहे. या दोन्ही कलाकारांनी २०१८ मध्ये एकमेकांशी लग्न केल्याचे सांगितले. या लग्नाअगोदरच्या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट देखील केल्याचे दिसून आले होते.

Tags

follow us