…म्हणून चिन्मय मांडलेकर म्हणतोय, उद्या मिळणार एक आनंदाची बातमी!

…म्हणून चिन्मय मांडलेकर म्हणतोय, उद्या मिळणार एक आनंदाची बातमी!

Subhedar Marathi Movie : “आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच” म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार’ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद… त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा आणि त्यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘सुभेदार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( Subhedar Movie song Out Tomorrow Chinmay Mandalekar Post on Instagram )

दरम्यान प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना आता या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याबद्दल चिन्मय मांडलेकरने याबाबत एक पोस्ट करत माहिती दिली आहे. चिन्मय मांडलेकरने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘उद्या मिळणार एक आनंदाची बातमी! मावळं जागं झालं रं गाणं येतय उद्या. यावेळी त्यावेळी त्याने या गाण्याचं पोस्टर देखील शेअर केलं आहे.

किलर पोज देत अवनीतने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या सिनेमात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत असल्याचे समजले आहे. त्यांनी नुकताच सुभेदार या सिनेमामधील पहिला लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

‘गदर’ला विरोध; सनी देओलचा मोठा खुलासा…

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे,दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर,श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube