Pushpa 2 Pre Box Office: साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2 Movie) या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला होता. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहिल्यानंतर सर्वांना खात्री होती की, हा चित्रपट खूप गाजणार आहे. मात्र, या चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू झाले नसून चित्रपटाने जोरदार व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. रिलीजपूर्वीच ‘पुष्पा 2’ने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
‘2021 मध्ये पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुष्पा 2: द रुल’ रिलीज होण्याआधीच व्यवसाय करू लागला आहे. एका अहवालानुसार अल्लू अर्जुनचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच त्याची कमाई 1 हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. ‘पुष्पा’ एक मोठा ब्रँड बनला आहे. या चित्रपटाच्या इतर भागांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे निर्माते चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे तो चित्रपटाची चर्चा कमी होऊ देत नाही.
Pushkar Jog : अपघातानंतर अभिनेता मायदेशी परतला, एअरपोर्टवर अशा अवस्थेत…
ट्रॅक टॉलीवूडच्या रिपोर्टनुसार,’पुष्पा 2’ने इतिहास रचला आहे. हा पहिला भारतीय चित्रपट आहे. ज्याने प्री-रिलीज किंवा प्री-बॉक्स ऑफिस व्यवसायादरम्यान 1 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. KGF Chapter 2 आणि RRRला देखील अशी कामगिरी करता आली नाही. हिंदी डब केलेल्या भाषेसाठी, थिएटरचे हक्क 200 कोटी रुपये आहेत. दक्षिण भारतीय प्रदेशांच्या थिएटर हक्कांचे मूल्य 270 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. विदेशी बाजारपेठेत 100 कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल अपेक्षित आहे. या चित्रपटाने केवळ थिएटर राइट्सच्या माध्यमातून 550 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.
नेटफ्लिक्सने ‘पुष्पा 2’च्या स्ट्रीमिंग अधिकारांसाठी 275 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. शिवाय ऑडिओ आणि सॅटेलाइट अधिकारांसह ही रक्कम सुमारे 450 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. या आकड्यांमध्ये त्याचे थिएटरिकल राइट्सही जोडले तर चित्रपटाचा रिलीजपूर्वीचा व्यवसाय 1000 कोटी रुपयांच्या आकड्याला स्पर्श करतो.