Heartwarming Encounter Between Two Chhaya Kadams Chitrapataka Marathi Film Festival : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आयोजित करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव ‘चित्रपताका ’ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे उत्साहात संपन्न होत आहे. या महोत्सवात चित्रपट, कला आणि कलाकारांच्या सन्मानासोबतच काही अनपेक्षित, मनाला स्पर्शून जाणारे क्षणही अनुभवायला मिळत आहेत.
‘तू आहेस ना’मधून सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके एकत्र; लव्ह फिल्म्सकडून फर्स्ट लूकचे अनावरण
महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘तिचं नायिका होणं’ या परिसंवादासाठी प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम उपस्थित राहणार होत्या. त्यांच्या नावाचा उल्लेख असलेली कार्यक्रमाची यादी एका सफाई कर्मचारी महिलेच्या नजरेस पडली. त्यातील ‘छाया कदम’ हे नाव वाचताच त्या क्षणभर थांबल्या आणि टीममधील एका सदस्याला अगदी निरागसपणे म्हणाल्या, “माझं नाव लिहिलंय! मी छाया कदम आहे.” त्यांच्या या सहज, निरागस वाक्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मात्र, या छोट्याशा प्रसंगामागे एक हळवी गोष्ट दडलेली होती, याची कुणालाही कल्पना नव्हती.
‘प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो’; जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत
दुसऱ्याच दिवशी या दोन ‘छाया कदम’ समोरासमोर आल्या. एका बाजूला आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री छाया कदम, तर दुसऱ्या बाजूला चित्रपट महोत्सळाच्या आयोजनात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या छाया कदम. या भेटीदरम्यान बोलता बोलता सफाई कर्मचारी छाया कदम यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या मुलाचं निधन झाल्याचं सांगितलं. आयुष्यातील या दुःखद प्रसंगाचा उल्लेख ऐकताच अभिनेत्री छाया कदम यांनी कोणताही औपचारिकपणा न ठेवता त्यांना जवळ घेतलं. मायेने त्यांची विचारपूस केली, त्यांच्याशी आपुलकीने गप्पा मारल्या.
पंढरपुरात हत्येचा थरार! शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगेंना गोळ्या झाडून संपवलं
काही क्षणांसाठी तिथे अभिनेत्री आणि सफाई कर्मचारी असा कोणताही भेद उरला नव्हता. होत्या त्या फक्त दोन स्त्रिया… एकीने आपल्या अभिनयातून अनेक व्यक्तिरेखा जगल्या होत्या, तर दुसरी आयुष्यातील दुःख पचवत आपली जबाबदारी पार पाडत होती. पण त्या क्षणी दोघींना जोडणारा समान धागा होता तो म्हणजे ‘छाया कदम’ हे नाव आणि माणुसकीची भावना. चित्रपट महोत्सवात मोठ्या पडद्यावर अनेक कथा पाहायला मिळतात; पण कधी कधी पडद्याबाहेर घडणारे असे प्रसंग मनावर अधिक खोल ठसा उमटवून जातात. ही भेटही त्यापैकीच एक!
