Download App

Hina Khan च्या प्रकृतीबाबत धक्कादायक बातमी समोर; स्वतः पोस्ट करत म्हणाली…

Hina Khan ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. मात्र आता हिना खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Hina Khan gives health update by post on Instagram : छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री हिना खान (Hina Khan). ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून पदार्पण करणारी अक्षरा तर नुकतच कसोटी जिंदगी की -2 या मालिकेत कमौलिका ही खलनायक साकारणाऱ्या हिना खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी हालगर्जीपणा केला; सभागृहात गृहमंत्री फडणवीसांची कबुली

हिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट (post on Instagram) करत आपल्या प्रकृतीबद्दल माहिती (health update) दिली आहे. यामध्ये तिने आपल्याला स्तनाचा कर्करोग झाल्याचं सांगितलं आहे. तसेच आपल्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती ठीक असल्याचंही यावेळी हिनाने सांगितलं.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासूनच हिना खानच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियासह इंडस्ट्रीमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर स्वतः हिनानेच स्पष्टीकरण दिले आहे. या पोस्टमध्ये हिनाने म्हटलं आहे की, नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मी सर्व माझे चाहते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे.

Hemant Soren यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; जमीन खरेदी घोटाळ्या प्रकरणी जामीन मंजूर

मला स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्याचे निदान झालं आहे. मात्र या परिस्थितीत देखील मी खंबीर आणि कणखर आहे या आजाराला पूर्णपणे संपवण्यासाठी मी प्रयत्न करते माझ्यावर उपचार सुरू झाले असून या आजारावर मात करण्यासाठी मी सर्व काही प्रयत्न करत आहे. असं म्हणत हिनाने आपल्या प्रकृती विषयी माहिती दिली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून देखील तिची विचारपूस केली जात आहे.

follow us