Download App

Rohit Shetty च्या खतरों के खिलाडीने मारली बाजी; ठरला नंबर वन रिअ‍ॅलिटी शो

Khatron Ke Khiladi 13 : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या प्रसिद्ध शो खतरों के खिलाडी 13 ने बाजी मारली आहे. हा शो टिव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये नंबर एकचा शो ठरला आहे. याबद्दल स्वतः रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. यावेळी त्याने आभारही मानले आहेत. तो म्हणाला धन्यावाद खतरों के खिलाडीला पुन्हा एकदा नंबर वन केल्याबद्दल (Host Rohit Shettys Khatron Ke Khiladi 13 number 1 reality show on Television )

Ashok Saraf : कृतज्ञता सन्मान सोहळ्यात सराफ कुटुंबाने केला रंगकर्मींचा गौरव

दरम्यान हा शो 15 जुलैला हा शो सुरू झाला आहे. त्याला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली आहे. त्यानंतर आता खतरों के खिलाडी 13 ने बाजी मारली आहे. हा शो टिव्हीवरील रिअॅलिटी शोमध्ये नंबर एकचा शो ठरला आहे. तसेच या शोमध्ये आता दुसऱ्या कन्टेस्टंटला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या अगोदर रूही चतुर्वेदी शोमधून बाहेर पडली होती. त्यानंतर आता कुंडली भाग्यची सृष्टी म्हणजे अंजुम फकीह ही देखील बाहेर पडली आहे.

Pune News : पुणेकरांनो मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढली, महापालिकेने घेतला मोठा निर्णय…

या आठवड्यामध्ये एविक्शन स्टंटमध्ये एश्वर्या शर्मा आणि अंजुम फकीहला पाण्यात स्टंट करायचा हे चॅलेंन्ज देण्यात आलं होतं. त्यामध्ये दोघींना पाण्यात एका गोल पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. त्यात त्यांना फिरत पिरत झेंडे काढायचे होते. यावेळी अंजुम फकीह चांगली कामगिरी करत होती मात्र त्यात तिच्या शरीरीत पाणी गेलं. आणि ती पॅनिक झाली. त्यानंतर स्टंटला अॅबॉर्ट केल्याचं सांगत बाहेर काढण्यात आलं.

मात्र अंजुम फकीह ही लवकरच शोमध्ये पुन्हा एन्ट्री करणार असल्याचं देखील बोललं जात आहे. ती वाईल्ड कार्ड एन्ट्रीव्दारे शोमध्ये पुन्हा एन्ट्री करणार आहे. अंजुम फकीह गेल्यानंतर आता या शोमध्ये एश्वर्या शर्मा, शिव ठाकरे, अंजली आनंद, डेजी शाह, शाजन खान, अर्चना गौतम, अरिजित तनेजा, नायरा बॅनर्जी, सौंदस मौफाकिर, रश्मीत कौर, आणि रोहित रॉय एवढे कन्टेस्टंट असणार आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज