हाऊसफुल 5 मध्ये जॅकी, अक्षयनंतर नव्या कलाकारांची एंट्री; चित्रगंदा अन् डिनो झळकणार

अभिनेता अक्षय कुमारच्या हाऊसफुल 5 मध्ये चित्रगंदा सिंह आणि डिनो मोरियोची एंट्री झालीयं, डिनो आणि चित्रगंदा चित्रपटाच्या शुटींगसाठी लंडनला जाणार आहेत.

Housefull Movie

Housefull Movie

HouseFull 5 Movie : अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) हाऊसफुलमध्ये अभिनेत्री चित्रगंदा सिंह (Chitraganda singh) आणि डिनो मोरियोची (Dino Moraa) एंट्री झालीयं. त्यामुळे हा चित्रपट आणखीनच एनरटेनिंग झालायं. आपल्या दिलखेचक अदा आणि प्रभावाने प्रसिद्ध असलेली चित्रगंदा सिंह आणि डिनो आता हाऊसफुल 5 मध्ये सामिल झाले आहेत.

सुत्रांच्या माहितीनूसार, चित्रगंदा आणि डिननो या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. चित्रगंधा लांब टप्प्याच्या शुटींगसाठी लंडनला रवाना होणार आहे. यामध्ये क्रूजवरही एका सीनमध्ये चित्रगंदा झळकणार आहे. हाऊसफुल 5 ची शुटींग 15 सप्टेंबरपासून सुरु होणार असून लंडनमध्ये जवळपास 45 दिवस शुटींग असणार आहे. तर डिनोही लवकरच लंडनमध्ये चित्रपटाची शुटींग करणार आहे.

गणेशभक्तांसाठी स्वरूप भालवणकर, सुदेश भोसले आणि आरजे अर्चना पानिया यांचा “बाप्पाचा बोलबाला” गाणं रिलीज

साजिद नाडियाडवाला यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली जात असून निर्देशक म्हणून मनसुखानी तरुण काम पाहणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस लंडनमध्ये चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असून डिनो आणि चित्रगंदाची एंट्री चित्रपटाला आणखीन रोमांचक बनवणार आहे. याआधीच चित्रपटात अक्षय कुमार, रितेश कुमार, फरदीन खान, संजय दत्त, जॅकी श्रॉफ झळकणार आहेत.

अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘हाऊसफुल’ फ्रेंचाइजीने लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. हाऊसफुल फ्रँचायझी गेल्या 14 वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटाचे चार भाग आले आहेत. पाचवा भाग पुढील वर्षी येण्याची शक्यता आहे. भारतीय चित्रपटांमधील ही आतापर्यंतची सर्वात लांब फ्रेंचाइजी असेल. अशा परिस्थितीत आता अभिनेता जॅकी श्रॉफनेही अधिकृतपणे साजिद नाडियाडवालाच्या ‘हाऊसफुल 5’ मध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी, या अभिनेत्याची एन्ट्री होताच, चित्रपटाची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला जाणार आहे.

Exit mobile version