Housefull 5: खिलाडी कुमार पुन्हा धमाल करणार…; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हाऊसफुल 5’

Housefull 5: खिलाडी कुमार पुन्हा धमाल करणार…; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘हाऊसफुल 5’

Housefull 5 Release Date : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजमुळे देखील चर्चेत असतो. सध्या ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मिशन रानीगंज’ या सिनेमाच्या यशानंतर खिलाडी आता ‘हाऊसफुल 5’ या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


मात्र आता या सिनेमासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2025 मध्ये हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘हाऊसफुल 5’ हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांनी सांगितलं होत. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता खिलाडीने या सिनेमाची नवी रिलीज डेटची घोषणा केली आहे. 2025 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘हाऊसफुल’च्या चाहत्यांना आणखी थोडेचं दिवस वाट पाहावी लागणार आहे.

‘हाऊसफुल्ल 5’ या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेमध्ये आहे. खिलाडीने आता सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सिनेमाची नवी रिलीज डेटची घोषणा केली आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत निर्माते साजिद नाडियाडवाला यांचं एक स्टेटमेंट देखील जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की, “हाऊसफुल फ्रेंचायझीचं यश प्रेक्षकांना माहिती आहे. आता ‘हाऊसफुल्ल 5’ला चाहत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा करतो.

Ajay Devgn Injured: ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी

साजिद नाडियाडवाला यांनी पुढे सांगितलं आहे की, “हाऊसफुल्ल 5′ या सिनेमाचं कथानक चांगलं आहे. या सिनेमामध्ये वीएफएक्सतंत्राचा देखील उपयोग करण्यात आला आहे. ‘हाऊसफुल्ल 5’ हा सिनेमा तुमचं नक्कीच मनोरंजन करणार आहे, अशी आशा करतो. याच कारणाने हा सिनेमा 6 जून 2025 रोजी सिनेमागृहामध्ये रिलीज होईल.

अक्षय कुमारने पोस्टर शेअर करत सांगितले आहे की, “पाचव्यांदा मनोरंजनाचा धमाका करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 6 जून 2023 ला सिनेमागृहात लवकरच भेटू”. ‘हाऊसफुल्ल 5’ या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे. तरुण मनसुखानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘हाऊसफुल्ल 5’ या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube