गणेशभक्तांसाठी स्वरूप भालवणकर, सुदेश भोसले आणि आरजे अर्चना पानिया यांचा “बाप्पाचा बोलबाला” गाणं रिलीज

  • Written By: Published:
गणेशभक्तांसाठी स्वरूप भालवणकर, सुदेश भोसले आणि आरजे अर्चना पानिया यांचा “बाप्पाचा बोलबाला” गाणं रिलीज

Bappacha Bolbala : लाडक्या बाप्पाच्या उत्सवात येणारी नवीन नवीन गाणी गणेशभक्तांना फार आनंद देते. यावर्षी देखील या उत्सवात एक नवीन गाणं रिलीज झाला आहे. गायक संगीतकार स्वरूप भालवणकर (Swaroop Bhalvankar) , दिग्गज गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) आणि प्रसिद्ध आरजे अर्चना पानिया (RJ Archana Pania) यांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी “बाप्पाचा बोलबाला” हे गाणं घेऊन आले आहेत.

नुकतंच याचा म्युझिक व्हिडिओ देखील लाँच करण्यात आले आहे. “बाप्पाचा बोलबाला” गाणं पॉवर पॅक्ड आणि एनर्जीने भरपूर आहे. या गाण्याचे गायक संगीतकार स्वरूप भालवणकर असून दिग्गज गायक सुदेश भोसले ह्यांनी देखील या गाण्याला आपला आवाज दिला आहे. दिग्गज गायक सुदेश भोसले यांनी आपल्या आवाजाने आजवर गणेश उत्सवाची शान वाढवली आहे.

तर प्रसिद्ध आरजे अर्चना पानियाने देखील या गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्याद्वारे आरजे अर्चना पानिया सिंगर म्हणून पदार्पण करत आहे. मला विश्वास बसत नव्हता की मला या गाण्यात आवाज देण्याची संधी मिळेल. गणपती बाप्पाने मला दुसऱ्यांदा संगीतकार स्वरूप भालवणकर ह्यांच्या मुळे निवडला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली.

तर “बाप्पाचा बोलबाला” या गाण्याचे बोल बॉलीवूड गीतकार कुमार यांनी अगदी अप्रतिमपणे लिहिले आहे. या गाण्यात सोशल मीडिया इन्फ्लूएंसर तन्मय पाटेकर देखील पाहायला मिळणार आहे. युनिव्हर्स व्हायब्रंट आणि मोरया क्रिएशन्सद्वारे हे गाणं रिलीझ करण्यात आले आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 70 वर्षांवरील वृद्धांना मिळणार मोफत उपचार

युनिव्हर्स व्हायब्रंटचे स्वरूप भालवणकर आणि प्रशांत थोपील यांनी या गाण्याची संकल्पना मांडली आहे, त्यांना खात्री आहे की “बाप्पाचा बोलबाला” या वर्षाच्या गणेश उत्सवासाठी सर्व मंडळे आणि गणेशभक्तांच्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच असणार.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या