‘गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल, चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी 'गोंधळ' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले.

Untitled Design (20)

Untitled Design (20)

Housefull of experiments with the film ‘Gondhal’ : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी 24 एप्रिल 2026 रोजी ‘गोंधळ’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

या प्रदर्शनावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे निर्माते – दिग्दर्शक संतोष डावखर, क्रिएटीव्ह प्रोड्युसर राम बेंदिरकर, चीफ असिस्टंट डिरेक्टर संकेत सावंत आणि कलाकारांपैकी किशोर कदम, ईशिता देशमुख, अनुज प्रभू उपस्थित होते.

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मुखवटाधारी इराणी कमांडोंनी भारतीय जहाजे घेतली ताब्यात; कारण काय?

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर 2025 पासून या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर श्री.साजणीकर यांनी चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास संवाद साधला. टीमनेदेखील चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेवेळी घडलेले विविध घटना, आठवणी प्रेक्षकांना सांगितल्या.

Exit mobile version