हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मुखवटाधारी इराणी कमांडोंनी भारतीय जहाजे घेतली ताब्यात; कारण काय? 

Revolutionary Guard :  अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या युद्धात चर्चेत आलेल्या हॉर्मुझची सामुद्रधुनी वर पुन्हा एकदा इराणने आपला दावा करत

Revolutionary Guard

Revolutionary Guard :  अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या युद्धात चर्चेत आलेल्या हॉर्मुझची सामुद्रधुनी वर पुन्हा एकदा इराणने आपला दावा करत 22 एप्रिल रोजी दोन जहाजे जप्त केली आहे. इराणच्या रिव्हेल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिलच्या रोजी एमएससी फ्रान्सिस्का (पनामा ध्वज) आणि इपामिनोड्स (लायबेरिया ध्वज) या दोन जहाजांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक गुजरातच्या दिशेने येत होता. भारताकडे येणारी व्यापारी जहाजे ताब्यात घेतल्यानंतर इराणकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये मुखवटा घातलेले कमांडो जहाजांचा पाठलाग करताना दिसत आहे आणि काही वेळानंतर जहाजावर चढून ताब्यात घेताना या व्हिडिओमध्ये इराणी गार्ड्स दिसत आहे. तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात देखील हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जग अर्णव  आणि सनमार हेराल्ड या दोन भारतीय जहाजांवर हल्ला केला होता. तर पुन्हा एकदा इराणने दोन जहाजे ताब्यात घेतले आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, एमएससी फ्रान्सिस्का (MSC Francesca) पनामा ध्वज असणारा जहाज आणि इपामिनोड्स (Epaminondas) लायबेरिया ध्वजसह येणारा जहाज इराणच्या ताब्यात आहेत. त्यापैकी इपामिनोड्स हे जहाज दुबईहून गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे येत होता मात्र त्याला पुन्हा एकदा इराणच्या किनाऱ्यावर नेण्यात आल्याची माहिती इराणी मीडियाकडून देण्यात आली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डकडून (Revolutionary Guard) देण्यात आलेल्या माहितीनुसार, या मालवाहू जहाजांकडे आवश्यक परवानगी नव्हती. तसेच या जहाजांनी नेव्हिगेशन सिस्टिमध्ये फेरफार करुन नियमांचे उल्लंघन केल्याने सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला होता म्हणून या जहाजांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रिव्होल्युशनरी गार्ड्सकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात बीबीसीकडून करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील या घटनेचा व्हिडिओमधील काही क्लिप्स प्रत्यक्ष घटनेच्या साधारण 8 तासांनंतर चित्रित करण्यात आली आहे.

अमेरिकेला प्रत्युत्तर?

इराणकडून व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ अमेरिकन सैन्याने तुस्का या इराणी मालवाहू जहाजाला जप्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे इराणने देखील आता अमेरिकेला प्रत्युत्तर दिले असल्याची चर्चा सुरु आहे. अमेरिकन विशेष दलाने असा दावा केला होता की, या जहाजाने इराणी बंदरांच्या नाकेबंदीतून निसटण्याचा प्रयत्न केला होता.

आणखी एक खरात! स्वतःला बाळूमामा भासवून फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या; राजकीय कनेक्शन समोर येणार?

युएसएस स्प्रुआन्स या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकेने इराणचा ध्वज असलेल्या या जहाजाला इशारा दिला होता मात्र तरीही देखील तुस्का थांबले नाही. भारताच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावरील या हल्लामुळे भारत आणि इराणमधील संबंध गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.

follow us