Download App

“सेटलमेंट होईपर्यंत यायचं नाही” : गायक सुरेश वाडकर यांना धमकावत 20 कोटींच्या खंडणीची मागणी

Suresh Wadkar Extortion Case : नाशिक शहरामध्ये संगीत महाविद्यालयासाठी सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळत असल्याचे दिसत आहे. (Nashik Crime) वाडकर यांच्या स्वीय सहायकला (PA) संबंधित जागेवर जाण्यापासून अडवीत दोन संशयितांनी दरगोडे बंधूंसाठी 15 तर, टोळीसाठी पाच अशी सुमारे 20 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. (Nashik Police) खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिध्द गायक वाडकर यांच्या भूखंड खरेदीचा विषय एक ते दीड दशकांपासून गाजत आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात आयोजित पुरस्कार सोहळ्यात वाडकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी संगीत महाविद्यालयासाठी जागा खरेदी व्यवहारात कशी फसवणूक याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. आणि या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याने उर्वरित काम कुठे रखडली आहेत, हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी वाडकर यांचे मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते.

Sunny Deol: ‘बॉर्डर 2’ आणि ‘गदर 3’ च्या सिक्वेलवर सनी देओलने थेटच सांगितलं, म्हणाला…

खंडणी सोबत जीवे मारण्याची धमकी : गायक सुरेश वाडकर यांचे पीए तक्रारदार मुनीराज मीना हे मंगळवारी दुपारच्या सुमारास वाडकर यांची मुक्तीधाम जवळील जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी तिथं वाडकर यांनी नेमलेला खासगी सुरक्षा रक्षक बाहेर गेलेला होता. तेवढ्यात त्याठिकाणी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोन अनोळखी युवक आले. त्यांनी मीना यांना “तू इथं कशाला आला, सेटलमेंट होईपर्यंत यायचं नाही, असं म्हणून त्यांच्या शर्टची कॉलर पकडली होती.

आम्ही नाना कंपनीची माणसं आहोत, पुन्हा जर इथं दिसला तर तो तुझा शेवटचा दिवस राहील,” असं जीवे मारण्याची धमकी दिली. आणि पंधरा कोटी व गॅंग साठी पाच कोटींच्या खंडणीची मागणी यावेळी करण्यात आली आहे,” अशी तक्रार मीना यांनी उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्या दुचाकीस्वारांचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

follow us