Nashik मध्ये महिला सुरक्षा ऐरणीवर; मोठं पाऊल उचलत पोलिसांनी दिला गंभीर इशारा

Nashik मध्ये महिला सुरक्षा ऐरणीवर; मोठं पाऊल उचलत पोलिसांनी दिला गंभीर इशारा

Nashik : नाशिकमध्ये (Nashik) महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठं पाऊल उचलत महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. गेले दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांकडे एका 24 वर्षीय मुलीने व्हाट्सअपवर मेसेज करत तिला एक मुलगा त्रास देत असल्याची माहिती देत मदतीचा आवाहन केलं. त्यामध्ये तिने तिच्या ओळखीच्या मुलाने तिचा मानसिक छळ करत सुसाईड नोटची प्रत पाठवली असल्याच सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी हे पाऊलं उचललं आहे.

Maratha Reservation : धक्कादायक! पहिली पास कर्मचाऱ्यावर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी…

हा मुलगा या मुलीला त्रास देत होता. तिला आत्महत्येची धमकी देत होता. मात्र जीवन ही तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली. त्यावेळी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या मुलाला त्याच्या पालकांसह पोलीस स्टेशनला बोलावलं आणि होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत इशारा देण्यात आला. त्याचबरोबर त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली.

दरम्यान अशाच प्रकारचे मानसिक स्थळाचे प्रकरण शहरात आणि जिल्ह्यात इतर कोठेही होत असल्यास त्याबाबत तक्रार करण्याचा आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आले. त्यासाठी त्यांनी एक व्हाट्सअप नंबर जारी केला आहे त्यावर संबंधित महिलेने किंवा मुलीने आपल्या तक्रारीसंबंधीचा मेसेज करण्याचं सांगितला आहे.

Bapalyok: बाप- लेकाची हलकीफुलकी कहाणी असलेला ‘बापल्योक’ आता अॅमेझॅान प्राईमवर

या वाहनांमध्ये नाशिक पोलिसांनी म्हटलं आहे की, सावध रहा, महिलांकडून केल्या जाणाऱ्या मानसिक छळ आणि शारीरिक हिंसा याबाबतच्या ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. त्याचबरोबर अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारचा सामना कोणत्याही महिलेला किंवा मुलीला करावा लागत असेल तर त्यांनी शांत राहू नये या व्हाट्सअपनंबरवर (99 23 32 33 11 ) आपल्या तक्रारी संबंधात मेसेज करावा त्याचबरोबर या तक्रारदार महिलेची ओळख ही गुप्त ठेवली जाईल असं आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज