Download App

Kanni Teaser: हृता दुर्गुळेच्या हसू अन् आसूने भरलेल्या ‘कन्नी’चे टिझर प्रदर्शित

Kanni Pre Teaser Release: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी ‘कन्नी’ (Kanni Movie) येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर (social media) झळकले आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे (Hritha Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. (Marathi Movie) आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी 8मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.’

Ankita Lokhande: अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 मधील तिच्या अनफिल्टर्ड गेमने जिंकली प्रेक्षकांची मन

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ‘पोस्टर जरी तरुणाईला आकर्षित करणारे असले तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्ने ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. या सगळ्यांना जोडणाऱ्या ‘कन्नी’ची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसाठी खास हे नवीन पोस्टर आणले आहे त्यासोबतच पतंग उडवून मकर संक्रांत साजरीही केली. खूप धमाल केली. अशीच धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाही येणार आहे.’

follow us