Download App

Fighter Movie: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ चित्रपटाच चित्रीकरण केलं पूर्ण

Fighter Movie Shooting Complet: दिग्गज दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) त्याच्या आगामी ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाचे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे, याबद्दल सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेयर केली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट सध्या चर्चेत असल्याने चाहते आणि इंडस्ट्रीतील लोक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.


‘फायटर’ चित्रपटाची झलक शेअर करून दिग्दर्शक सतत त्याच्या चाहत्यांसाठी काही न काही नवीन घेऊन येत आहेत. आता शूटिंगचा प्रवास संपला असून हा हाय-ऑक्टेन अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे आणि सगळ्यांना याची मोठी उत्सुकता लागली आहे.

हृतिक रोशन (hrithik roshan) आणि सिद्धार्थ आनंद यांनीही त्यांच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अप्रतिम कथा आणि दूर दृष्टी असलेला दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थ आनंद “फायटर” मधून पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. तसेच हृदयस्पर्शी आणि थरारक व्हिडिओने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आकर्षक कथा असलेला “फायटर” हा एक हाय- ऑक्टेन अॅक्शन-पॅक असणार आहे यात काही शंका नाही.

Ketaki Chitale: ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, आरक्षणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. फायटरमध्ये हवाई कारवाई पूर्ण होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा सिनेमा 25 जानेवारी 2024 दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज