सिध्दार्थच्या फायटर्सने घेतला कॉफी ब्रेक, हृतिकने घेतला सेल्फी, दीपिकानं दिलं स्माईल; फोटो व्हायरल
fighter : सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) बहुप्रतीक्षीत ‘फायटर’ (fighter) या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. सध्या चित्रपटाची टीम इटलीमध्ये आहे आणि तिथं या चित्रपटाच्या दोन गाण्यांचे चित्रीकरण सुरू आहे. दरम्यान, शूटिंगच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सेल्फी घेताना दिसत आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) चित्रपटाच्या टीमसोबत दिसत आहे.
सिद्धार्थ आनंदने 10 जानेवारी 2021 रोजी या अॅक्शन चित्रपटाची घोषणा केली होती. सिद्धार्थ आणि हृतिकने यापूर्वी एकत्र काम केले आहे, त्यामुळे या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी हृतिकला फायनल करण्यात आलं होतं. पण जेव्हा या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोण असल्याची बातमी समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण, आतापर्यंत हृतिक आणि दीपीकाने कधीही एकत्र काम केलं नव्हतं. पहिल्यांदाच या चित्रपटात हृतिक आणि दीपीका एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. दरम्यान, दीपिका आणि हृतिकचा हा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
दोन गाण्यांचे शूटिंग सुरू
‘फायटर’ चित्रपटाच्या सध्या दोन गाण्यांचे शूटिंग सुरू आहे. दरम्यान, जेव्हा चित्रपटाच्या टीमने कॉफी ब्रेक घेतला तेव्हा हृतिकने एक सेल्फी घेतला, ज्यामध्ये प्रत्येकजण मजा करतांना दिसत आहेत. फोटोमध्ये हृतिक, दीपिका, सिद्धार्थ आनंद, त्याची पत्नी ममता आनंद आणि कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस दिसत आहेत. या फोटोमध्ये सर्वजण फोटोसाठी पोझ देत एकत्र कॉफीचा आनंद लुटत आहेत. या फोटोत हृतिकने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळअया रंगाची हुडी घातला आहे. तर दीपीकांना पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. या फोटोंत दोघंही खूप देखने दिसत आहेत.
World Cup : महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार नसून चित्रपट दिग्दर्शक; अश्विनच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
हृतिक आणि दीपिकाचा हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटचा आहे. पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनिल कपूरचीही भूमिका असल्याचं सांगितल्या जातं आहे.