Download App

‘फायटर’मधील अक्षय ओबेरॉयचा जबरदस्त लूक रिलीज; सिनेमात साकारणार ‘ही’ भूमिका

Fighter New Poster: सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनातील मोस्ट अवेटेड सिनेमा ‘फायटर’ची (Fighter Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांची उत्कंठा वाढवत असतानाच निर्मात्यांनी ‘फायटर’मधील अभिनेता अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) जबरदस्त लूकचा पोस्टर शेअर करुन या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.


फायटर या सिनेमात अक्षय ओबेरॉय हा स्क्वाड्रन लीडर बशीर खान ही भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सिनेमाचं पोस्टर शेअर करुन अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “स्क्वाड्रन लीडर बशीर खान,कॉल साइन: बॅश, Designation: वेपन सिस्टम ऑपरेटर ,युनिट: एअर ड्रॅगन्स”

‘फायटर’ या सिनेमामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण,करण सिंह ग्रोवर आणि अनिल कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. तर दीपिका पदुकोण ही स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनीची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे. या सिनेमात अनिल कपूर हे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन राकेश जयसिंह उर्फ ​​रॉकी या दमदार अभिनयात दिसणार आहे. तर करण सिंह ग्रोवर हा या सिनेमात स्क्वाड्रन लीडर सरताज गिल ही भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Jackie Shroff: जॅकी श्रॉफने स्मृती इराणींना दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘वजन कमी करा… ‘

फायटर हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदनं यांनी सांभाळली आहे. सिद्धर्थच्या ‘वॉर’, ‘बँग बँग’ या सिनेमाना चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. आता त्याच्या फायटर या सिनेमाला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळणार का?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. फायटर या सिनेमात हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

Tags

follow us