Independence Day: अक्षय, राजकुमार आणि जॉन अब्राहम? बॉक्स ऑफिस कोण गाजवणार? तुम्हाला काय वाटतं?

Independence Day: बॉक्स ऑफिसवर वेगळीच लढाई अनुभवयाला मिळणार आहे. जॉन अब्राहमच्या "वेदा" ची अनोखी चर्चा असून तो पॉवरहाऊस कामगिरीचा ट्रेडमार्क आहे.

Akshay Kumar Rajkumar Rao John Abraham

Akshay Kumar Rajkumar Rao John Abraham

Independence Day: 15 ऑगस्ट हा दिवस सिनेमा रसिकांसाठी सर्वात मोठा फिल्मी वीकेंड ठरणार आहे, कारण अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘खेल खेल में’, राजकुमार रावचा (Rajkumar Rao) ‘स्त्री 2’ आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘वेद’ यांच्यात बॉक्स ऑफिसवर लढत बघता येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. अक्षय एक स्टार पॉवर चित्रपट घेऊन येणार आहे तर राजकुमार रावने पॉवरहाऊस म्हणून स्वतःची प्रतिमा प्रस्थापित केली आहे आणि तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती व्यक्तिरेखा बिकी म्हणून परत येत आहे.


बॉक्स ऑफिसवर वेगळीच लढाई अनुभवयाला मिळणार आहे. जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ची अनोखी चर्चा असून तो पॉवरहाऊस कामगिरीचा ट्रेडमार्क आहे. या महाकाव्य बॉक्स ऑफिस लढाईची अपेक्षा प्रेक्षकांना असताना चाहते उत्सुकतेने चर्चा करत आहेत की कोणता चित्रपट सुपरहिट ठरणार आहे. अक्षय कुमारची स्टार पॉवर ‘खेल खेल में’ विजयाकडे नेईल का? राजकुमार रावचा ‘स्त्री 2’ मूळची जादू पुन्हा गाजवेल का? की ” वेदा ” मधला जॉन अब्राहमचा दमदार अभिनय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवेल?

अक्षय कुमारचे यावर्षी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘सरफिरा’ असे दोन रिलीज झाले असताना राजकुमार रावने ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मधील त्याच्या निर्दोष अभिनयाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि स्वत:ला सर्वात शक्तीशाली अभिनेता असल्याचे सिद्ध केलं आहे आणि तो ‘स्त्री 2’ सोबत हॅट्ट्रिक मारण्याच्या तयारीत आहे.

Akshay Kumar: ‘तुम्हे थप्पड़ चाहिए’, अक्षयने कतरिना कैफला थेट सुनावलं, कारण काय?

दुसरीकडे जॉन त्याच्या चाहत्यांना ‘पठाण’ पासून वाट बघायला लावत असताना ‘वेदा’ साठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 15 ऑगस्ट हा दिवस बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांसाठी रोमांचक असणार आहे. एकाच वेळी तीन बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सिनेप्रेमींना अनोखी पर्वणी असणार आहे. तुम्ही कोणाची वाट पाहत आहात?

Exit mobile version