Download App

मुंबईतील हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचे लग्न, हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींना नको त्या अटी?

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खान (Aamir Khan) आणि रीना दत्त यांची लेक आयरा खान (Ira Khan) आज तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. (Nupur Shikhare Wedding:) गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. हळदी, मेहेंदी आणि संगीत असे सर्व विधी काल (२ जानेवारीला) पार पडले. दरम्यान नूपुरने आयरासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.


नूपुरने शेअर केलेले फोटो कुठल्यातरी लग्नसोहळ्यातील आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इरा खान तुझा नवरा होण्याचा आणखी एक दिवस बाकी. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.” या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास 900 सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. हे दोघे आज मुंबईतील ताज लँड एंड येथे कुटुंब आणि जवळच्या लोकांमध्ये शाही विवाह पार पडणार आहे. आयरा आणि नुपूरचे लग्न आज दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर 8 जानेवारी रोजी उदयपूरमध्ये या जोडप्याचे मोठे फॅट वेडिंग होणार आहे. यामध्ये सलमान खानसह सर्व बॉलिवूड स्टार्स सहभागी होणार आहेत. यानंतर 13 जानेवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन होणार आहे, यामध्ये बॉलिवूडमधील सर्व दिग्गज उपस्थित राहणार आहेत. सध्या अतिथींची यादी अद्याप समोर आलेली नाही.

दिवसेंदिवस किंग खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, 13व्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई

ही असणार अट?आयरा आणि नुपूरच्या लग्नात कोणतीही गिफ्ट पॉलिसी नाही. या जोडप्याने ठरवले आहे की, त्यांनी कोणतेही भेटवस्तू स्वीकारणार नाहीत. लग्नात कोणत्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही, ज्यांना भेटवस्तू किंवा पैसे द्यायचे आहेत ते एनजीओला मदत करू शकता अशी त्यांनी यावेळी अट ठेवली आहे. ज्याला भेटवस्तू द्यायची असेल त्यांनी आगत्सू फाउंडेशनला भेटवस्तूद्वारे देणगी देऊ शकता, असे त्यांनी म्हटले आहे.

आयरा आणि नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी 2022 मध्ये एकमेकांशी लग्न केले. या कपलला अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. नूपूर व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे, तिने आमिर खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सना प्रशिक्षण दिले आहे.

follow us