‘सिल्कयारा 41’! आमिर खान प्रॉडक्शन्सकडून भारत-ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त चित्रपटाची निर्मिती
Silkyara 41 आमिर खान प्रॉडक्शन्स (भारत), माइंड ब्लोइंग फिल्म्स (ऑस्ट्रेलिया) आणि कबीर खान फिल्म्स यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे.
‘Silkyara 41’ Aamir Khan Productions to produce India-Australia co-production : आमिर खान प्रॉडक्शन्स (भारत), माइंड ब्लोइंग फिल्म्स (ऑस्ट्रेलिया) आणि कबीर खान फिल्म्स यांनी ‘सिल्कयारा 41’या चित्रपटाची घोषणा केली आहे. उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेवर आणि या मोहिमेत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले टनेलिंग तज्ज्ञ तसेच ऑस्ट्रेलियाचे स्थानिक हिरो अर्नोल्ड डिक्स यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर हा चित्रपट आधारित आहे.
‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’चा थरारक लूक समोर! छाया कदम यांना ओळखणंही झालं कठीण
या चित्रपटाची कथा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पटकथालेखक अँड्र्यू अनास्टासिओस (‘द वॉटर डिवाइनर’) यांनी लिहिली असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते भारतीय दिग्दर्शक कबीर खान (‘बजरंगी भाईजान’, ’83’) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सर्जनशीलतेचा, कथा सांगण्याच्या परंपरेचा आणि निर्मिती कौशल्याचा सुंदर संगम या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
योग्य गोष्टींसाठी उभं राहण्याची प्रेरणा देणाऱ्या 5 मनाला भिडणाऱ्या चित्रपट कथा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असताना आणि द्विपक्षीय सहकार्याचा नवा अध्याय सुरू होत असतानाच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘सिल्कयारा 41’ हा चित्रपट सहकार्य, समान मूल्ये आणि मानवी जिद्दीचे प्रभावी प्रतीक म्हणून समोर येत आहे.
शरद पवार NDA मध्ये जाणार? विविध चर्चांना तोंड फुटलेलं असतानाच सुप्रिया सुळेंचं फायनल उत्तर आलं…
आमिर खान प्रॉडक्शन्सचे संस्थापक आणि निर्माता आमिर खान म्हणाले, “माइंड ब्लोइंग फिल्म्स आणि आमिर खान प्रॉडक्शन्स यांच्यातील या विशेष सहकार्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मला मनापासून भावली. प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, जिद्द, बुद्धिमत्ता आणि माणुसकीचा विजय दर्शवणारी ही प्रेरणादायी कथा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये नव्या पर्वाची सुरुवात करत असलेल्या या ऐतिहासिक दिवशी या चित्रपटाची घोषणा करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो. आमचे दोन्ही देश एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मानवी जिद्दीच्या विजयाची ही प्रेरणादायी कथा जगासमोर मांडत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.”