BB Marathi: मी चाळीस चपात्या करणार नाही’, रितेश भाऊसाठी पुरणपोळी बनवणारी इरिना स्पष्टच म्हणाली…

Bigg Boss Marathi: इरिना रुडाकोवाला भारताविषयी आणि मराठी भाषेविषयी खूप प्रेम आणि आपुलकी आहे. तिने जेव्हा तिच्या आईला 'बिग बॉस'च्या घरात जाण्याबद्दल सांगितले

BB Marathi: मी चाळीस चपात्या करणार नाही', रितेश भाऊसाठी पुरणपोळी बनवणारी इरिना स्पष्टच म्हणाली...

BB Marathi: मी चाळीस चपात्या करणार नाही', रितेश भाऊसाठी पुरणपोळी बनवणारी इरिना स्पष्टच म्हणाली...

Bigg Boss Marathi Irina Rudakova: ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) नव्या सीझनमध्ये यंदा विविध सदस्यांचा समावेश झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सदस्य या घरात आपला खेळ खेळताना दिसत आहेत. (Bigg Boss Marathi New Season) यावेळी पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एका विदेशी सदस्याने धमाकेदार एन्ट्री केली आहे. इरिना रुडाकोवा (Irina Rudakova) असं तिचं नाव असून, तिच्या येण्याने या घरात एक वेगळाच मसाला पाहायला मिळत आहे.


इरिना रुडाकोवाला भारताविषयी आणि मराठी भाषेविषयी खूप प्रेम आणि आपुलकी आहे. तिने जेव्हा तिच्या आईला ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याबद्दल सांगितले, तेव्हा तिच्या आईने तिला पूर्णपणे पाठिंबा दिला. इरिना म्हणते,”माझी आई म्हणाली, तुला आनंद मिळणार असेल तर मी सुद्धा आनंदी आहे”. घरात फोन नाही यावर इरिना म्हणाली ,” नेट आणि फोन नाही मला चालेल. मला फक्त शांती हवी आहे.”

इरिना पुढे म्हणाली,”मी ज्या देशात राहाते, तिथे ‘बिग बॉस’ नाही. पण दुसरा शो आहेत. मी लहान असताना असे शोज बघायचे आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की, हे लोक घरात कसे राहातात? जर मी त्या परिस्थितीत असते तर काय केले असते? आता मी या परिस्थितीत प्रत्यक्षात आहे. तर समजतेय की ते कसे असते”.

Bigg Boss Marathi: बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण पडलाय परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात?

घरातल्या कामांबद्दल इरिनाने सांगितले, “मी घरात ब्रेड बनवू शकते, पण चाळीस चपात्या नाही बनवू शकत. मला चपात्या बनवणे वेळ वाया घालवण्यासारखे वाटते. मी ब्रेड बनवते ब्रेड खा… पण इतर कामं मी करेन. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्ये इरिनाला मोठा चाहता वर्ग लाभणार हे निश्चित आहे. तिच्या आगमनाने घरात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळत आहे. इरिना या शोमध्ये अजून काय जादू दाखवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तिच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करेल आणि तिचा प्रवास निश्चितच रोमहर्षक असणार आहे.

Exit mobile version