Ishita Dutta: ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री इशिता दत्ताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन!

Ishita Dutta and Vatsal Sheth welcome baby boy : ‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’  या सिनेमात अजय देवगणची म्हणजेच सिंघमची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म (baby boy) दिला आहे. इशिता आणि तिचा नवरा वत्सल शेठ (Vatsal Sheth) मुलाचे पालक झाले आहेत. ती सध्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) आहे. […]

Ishita Dutta

Ishita Dutta

Ishita Dutta and Vatsal Sheth welcome baby boy : ‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’  या सिनेमात अजय देवगणची म्हणजेच सिंघमची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म (baby boy) दिला आहे. इशिता आणि तिचा नवरा वत्सल शेठ (Vatsal Sheth) मुलाचे पालक झाले आहेत. ती सध्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) आहे.


सध्या बाळ आणि आई दोघांची देखील प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मिळाल्या माहितीनुसार इशिता आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली आहे. इशिताला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची देखील माहिती यावेळी देण्यात आली आहे. बाळाच्या जन्मावर इशिता आणि वत्सलचे कुटुंबीय खूपच आनंदी असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच मंगळवारी इशिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये गर्भावस्थेत शेवटचा महिना खूप अवघड असल्याचे तिने यावेळी सांगितले होते. तसेच  ‘दृश्यम’ सिनेमामध्ये सिंघमच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ताने ‘टार्झन’ सिनेमात देखील सिंघमच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या वत्सलशी लग्न बंधनात अडकली आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

तसेच दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाला आता ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघेही एका गोंडस बाळाचे आई-बाबा झाले आहेत. त्यांच्यावर सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version