Download App

Adipurush’च्या वादावर ओम राऊतने एकाच शब्दांत उत्तर दिलं, ‘जय श्री राम…’

Om Raut On Adipurush Movie : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा अनेक वेगवेगळ्या कारणाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून जोरदार चर्चेत आला आहे. देशभरातील सिनेप्रेमी हा सिनेमा बघून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या दिल्लीतील स्क्रीनिंगला दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) हजेरी लावली होती. त्यावेळी या सिनेमाच्या कॉन्ट्रोवर्सीविषयी बोलत असताना ओम राऊत म्हणाला की,”जय श्री राम…” दिल्लीमधील चाणक्यपुरी येथील पीव्हीआरमध्ये दिग्दर्शक ओम राऊतने आणि सिनेमात लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या सनी सिंहने ‘आदिपुरुष’च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.

ओम राऊतने सिनेमातील डायलॉगवरील वादावर बोलणं त्याने टाळलले होते. ‘आदिपुरुष’च्या वादाच्या दरम्यान एका दिलेल्या मुलाखतीमध्ये ओम राऊत म्हणाला की, “रामायण हे खूप मोठं आहे. ते सर्वांना समजणे शक्य नाही. जर कोणी म्हणत असेल की मला रामायण समजतं तर ते खोटं बोलत आहेत. छोट्या पडद्यावरील रामायण हे मोठ्या स्तरावरचं होतं. आम्ही ‘आदिपुरुष’ला रामायण आजिबात म्हणत नाही. ‘आदिपुरुष’ हा रामायणाचा एक छोटासा भाग आहे”.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यावर या सिनेमावर जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी ओम राऊत म्हणाला होता की,”आदिपुरुष’ सिनेमाला नेटकरी ट्रोल करत आहेत, याचं वाईट वाटत आहे. पण आश्चर्य वाटत नाही. ‘आदिपुरुष’ सिनेमा रुपेरी पडद्याचा विचार करुन बनवण्यात आला आहे. पण नेटकरी करत असलेलं ट्रोलिंग मी थांबवू शकत नाही. मोबाईवर बघण्यासाठी हा सिनेमा नाही. या सिनेमाचा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करता आला असता, तर युट्यूबवर प्रदर्शित केला नसता.

Adipurush: सिनेमात भाव खाऊन जातेय ही मराठमोळी अभिनेत्री, म्हणते “जे आयुष्यात कधी केलं नाही…”

तसेच ओम राऊत पुढे म्हणाला की, “आदिपुरुष’ हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. सध्याच्या मुलांना रामायणाविषयी फारसे काही माहिती नाही. पण या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना रामायणाविषयी थोडी माहिती मिळणार आहे. हा सिनेमा थ्रीडीमध्ये बघताना तुम्हाला मजा येणार आहे.

‘आदिपुरुष’ या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 140 कोटींची मोठी कमाई केली आहे. तर दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us