Download App

‘मी तिची मुलगी आहे, या सत्यापासून…; श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवी कपूरने व्यक्त केलं दु:ख

Janhvi Kapoor : आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची (Sridevi) लेक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने नेसलेल्या चमकत्या काळ्या रंगाच्या साडीत सुरेख दिसत होती. एका कार्यक्रमामध्ये जान्हवी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबाबत जान्हवी कपूरने दु:ख व्यक्त केले आहे.

भारतीय चित्रपट उद्योगावर आपल्या अभिनयाने अनोखी छाप उमटवलेली श्रीदेवी आजही जान्हवीकरता एक आदराचं स्थान आहे. श्रीदेवीची मुलगी असल्याचे एक अनामिक ओझे, एक प्रकारचा दबाव कसा होता, याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, “तिने जे केले ते कुणी अभिनेत्री करू शकेल असे मला वाटत नाही, कुणीही तिच्याइतके अष्टपैलू आहे असेही मला वाटत नाही.

माझी तुलना माझ्या आईशी: आई ज्या पातळीवर अभिनय करायची, त्या तोडीचा अभिनय- मी तर राहू द्या, आणखी कुणी करू शकेल, असे मला वाटत नाही. आजच्या पिढीतही, अभिनेत्रींची तुलना तिचा नृत्यातील पदन्यास, त्यातील अचूकता, तिचे प्रत्येक सादरीकरण याच्याशी केली जाते. मला आणि माझ्या बहिणीला, सुरुवातीला तिच्या मुली असण्याचा खूप ताण यायचा, खूप अस्वस्थ व्हायला व्हायचं, श्रीदेवीची मुलगी हे ओझे वागवताना दमछाक व्हायची, पण नंतर मला कळायला लागलं की, माझी तुलना माझ्या आईशी (श्रीदेवी) केली जात आहे.

मला असं वाटतं की, यांतूनच मला प्रेरणा मिळू लागली आणि खरं तर, आईने मला सांगितलं होतं की, माझ्या पहिल्या चित्रपटाची आणि अभिनयाची तुलना तिच्या पहिल्या चित्रपटाशी केली जाणार नाही, तर ही तुलना तिच्या अखेरच्या चित्रपटाशी केली जाणार असे आई मला म्हणाली होती, हा असा दबाव तर माझ्या शत्रूवरही येऊ नये.

Emraan Hashmi: इमरान हाश्मी ठरला सिक्वेल हीरो; ‘टायगर 3’ ते ‘जन्नत 3’ अन् आवारापन 2

पहिला चित्रपट मिळाला: तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना जान्हवी पुढे म्हणाली की, “जेव्हा मी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी खूप सावध होते. मला आईपासून पूर्णत: वेगळी राहत होते, काहीही असो, लोकांना असंच वाटे की, मी श्रीदेवी कपूरची मुलगी असल्यामुळे मला पहिला चित्रपट मिळाला. मला माहीत नाही की, मी अशा कुठली वाट शोधत होते.

माझी सर्वात मोठी खंत: मी माझ्या आईची कोणतीच मदत घेणार नाही, मी माझ्या आईच्या अभिनयाच्या शैलीपेक्षा पूर्णपणे वेगळी अभिनय करेन असे ठरवले होते. आईला सेटवर येऊ नकोस, असं सांगायचे. मला असं वाटायचं की, मला एक ‘अन्यायकारक लाभ’ मिळतोय, एक हुकमी एक्का. मात्र आता मला वाटतं की, मी त्या वेळी मूर्ख होते. मी तिची मुलगी आहे, या सत्यापासून मी पळ काढू शकत नाही. आता आई हयात नाही, ही माझी सर्वात मोठी खंत आहे.

Tags

follow us