Download App

Dhamal 4: जावेद जाफरीने व्हिडिओ शेअर करत ‘धमाल 4’ बाबत दिली मोठी हिंट

Dhamal 4 New Update: 2007 मध्ये ‘धमाल’ (Dhamal Movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अर्शद वारसी (Arshad Warsi), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi), संजय दत्त (Sanjay Dutt), संजय मिश्रा आणि विजय राज असे अनेक स्टार्स दिसले होते. या चित्रपटाची कथा अशी होती की गोव्यात एका मोठ्या ‘डब्ल्यू’ खाली खजिना दडलेला आहे, हे चार मित्रांना कळते. त्यानंतर ते सर्वजण खजिन्याचा शोध घेऊ लागतात. लोकांना तो चित्रपट खूपचं आवडला. नंतर निर्मात्यांनी त्या चित्रपटाचे आणखी दोन भाग आणले. आणि आता पुन्हा एकदा धमाका होणार असल्याचं दिसतंय. ‘धमाल’चा चौथा भाग येणार असल्याचं समजतंय.

चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘डबल धमाल’ 2011 साली आला होता, आणि ‘टोटल धमाल’ या नावाने तिसरा भाग 2019 साली आला होता. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चौथ्या भागाबद्दल हिंट दिल्याचे समजत आहे. जावेदने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो ओळखला की नाही असे विचारताना दिसत आहे. तो आता स्मार्ट झाल्याचे देखील समजत आहे.


जावेद जाफरीचा व्हिडिओ

तो पुढे म्हणतो की, “डब्ल्यू’ आठवते? 17 वर्षांपूर्वी ‘डब्ल्यू’ अंतर्गत सापडलेल्या खजिन्याने आम्ही खूप श्रीमंत झालो होतो. पण आता आणखी एक खजिना असल्याची माहिती मिळाली आहे. तो खजिना ‘डब्ल्यू’च्या खाली नाही तर ‘एफ’च्या खाली आहे. पुढे तो चाहत्यांना ‘एफ’ चा अर्थ काय आहे याचा अंदाज घेण्यास सांगत आहे.

Mirzapur 3: मुन्ना भैया ‘मिर्झापूर 3’ मध्ये दिसणार नाही, कारण आलं समोर

या व्हिडिओवरून पुन्हा एकदा ‘धमाल’ची तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. निर्माते ‘धमाल 4’ आणू शकतात. व्हिडिओ शेअर करताना जावेदने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “टॉप सीक्रेट न्यूज आहे, हेडफोन लावून ऐका आणि ‘एफ’ म्हणजे काय ते सांगा.” आता व्हिडिओच्या कमेंटमध्ये चाहतेही विचारत आहेत की हा ‘धमाल 4’ बद्दलचा इशारा आहे का? जर हे खरोखरच असेल तर निर्माते कधीपर्यंत त्याची घोषणा करतील याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us