Download App

Jee Karda Trailer: मैत्रीच्या दुनियादारीची भन्नाट गोष्ट; तमन्ना भाटियाच्या ‘जी करदा’ चा ट्रेलर आउट

Jee Karda Trailer: तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), असा चेहरा आहे ज्या चेहऱ्याने केवळ दक्षिण भारतीय सिनेमाच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या प्रतिभेने आपली ख्याती निर्माण केली. तमन्नाने अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असते.


नुकताच तमन्ना भाटियाच्या ‘जी कारदा’ (Jee Karda) या वेब सीरिज ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये 7 मित्रांची कथा आणि त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवण्यात आला आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर 15 जूनला रिलीज होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘जी कारदा’ या वेब सीरिजची संपूर्ण कथा सात मित्रांभोवती फिरते. या वेब सीरिजमध्ये रोमान्स आणि मैत्रीसोबतच आयुष्यातील समस्याही दाखवण्यात आल्या आहेत.

‘जी कारदा’ ही वेब सीरिज 15 जूनला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे. तमन्ना भाटियाच्या (Tamanna Bhatia) व्यतिरिक्त या सीरिजमध्ये आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल आणि सायन बॅनर्जी या कलाकारांच्याही भूमिका महत्वाची आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन अरुणिमा शर्मा यांनी केले आहे. ‘जी कारदा’ वेब सीरिजचे एकूण 8 एपिसोड्स असणार आहेत.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

‘जी कारदा’ या तमन्ना भाटियाच्या वेब सीरिजची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. तमन्ना भाटियानं सोशल मीडियावर ‘जी कारदा’ या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला कमेंट करुन अनेक चाहत्यांनी तिच्या या आगामी वेब सीरिजसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बाहुबली या सिनेमामुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. तमन्नाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

गेल्या काही दिवसापासून तमन्नाचा बबली बाउंसर हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. तसेच तिचा प्लॅन ए प्लॅन बी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या सिनेमात तमन्नाबरोबर रितेश देशमुख हा देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता तमन्नाच्या ‘जी कारदा’ या वेब सीरिजची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

Tags

follow us