Download App

Jhimma 2 Movie Trailer : मनाला भावूक करणारा ‘झिम्मा 2’चा नवीन ट्रेलर प्रदर्शित

Jhimma 2 Movie Trailer : बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देत ‘झिम्मा 2’ (Jhimma 2 Movie) आता लवकरच चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करत आहे. आजही चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर पाहुन मन भावूक होणार हे तर नक्कीच. या ट्रेलरमध्ये आयुष्यात जिवाभावाची मैत्री किती महत्वाची असते, हे दिसून येत आहे.

ट्रेलर पाहुन जीव लावणाऱ्या मैत्रिणी असतील तर सगळया अडचणी शुल्लक वाटू लागतात. नात्यांची वीण घट्ट करणारा हा ट्रेलर मनाला स्पर्शून जाणारा आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

‘ओबीसी नेत्यांना नाव ठेवणार नाही ‘हा’ एकच बोलतोयं’; जरांगेंकडून भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख

झिम्मा 2 चित्रपटाबद्दल बोलताना हेमंत ढोमे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, यापूर्वीच आम्हाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. मुळात आता हा चित्रपट हा आमचा राहिला नसून हा तुम्हा सर्वांचा झाला आहे. आयुष्यात मैत्री असेल तर खूप गोष्टी सरळ, सोप्या होतात.

‘तुमच्यासोबत आम्हीही जिंकण्याचं स्वप्न पाहत होतो पण..,’; रोहित शर्मा भावूक

मग ते नाते कोणतेही असो. आई मुलीचे, सासू सुनेचे अथवा नवरा बायकोचे. मैत्री असणे खूप महत्वाचे. कोणत्याही अडचणींवर मैत्रीची हळुवार फुंकर मारली की आपोआप सगळं सुरळीत होते. हा नवीन ट्रेलर पाहून तुम्हालाही तुमच्या घनिष्ट मैत्रीची आठवण आल्या वाचून राहणार नसल्याचं ढोमे यांनी सांगितलं आहे.

Dunki: शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांवर जादू; ॲडव्हान्स बुकिंगला मोठी गर्दी

दरम्यान, आतापर्यंत आम्हाला प्रेक्षकांनी जे प्रेम दिले असेच प्रेम यापुढेही द्याल याची खात्री आहे. ज्यांनी ‘झिम्मा 2’ पाहिला त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा, असं आवाहनही हेमंत ढोमे यांनी केलं आहे. ‘झिम्मा 2’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने सांभाळली आहे. तर इरावती कर्णिकने लेखन केलं आहे. तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग या अशी दमदार कलाकारांची भूमिका आहे

Tags

follow us