Dunki: शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांवर जादू; ॲडव्हान्स बुकिंगला मोठी गर्दी

Dunki: शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची प्रेक्षकांवर जादू; ॲडव्हान्स बुकिंगला मोठी गर्दी

Dunki Advance Booking: सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप लकी ठरले आहे. त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) कमाल केली आणि आता त्याचा या वर्षातील शेवटचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) देखील रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि किंग खानची जोडी पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरले आहेत, (Dunki Advance Bookin) त्यामुळे परदेशात देखील सिनेमाची जोरदार बुकिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाने अमेरिकेत ॲडव्हान्स बुकिंगला मोठी गर्दी पाडली आहे.

शाहरुख खानचा हा चित्रपट अमेरिकेतील जवळपास 320 ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. ‘डंकी’चे बुकिंग नुकतेच तेथे सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी सुमारे 6 हजार 514 हजार तिकीटांची विक्री झाली. यूएसएमध्ये या चित्रपटाचे एकूण 915 शो झाले आहेत. ‘डंकी’ रिलीज होण्यासाठी अजून 9 दिवस बाकी आहेत आणि तिकीट अॅडव्हान्स बुकिंगमध्ये होत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात तिकिटांची विक्री करून कोटींचा गल्ला कमावला आहे.

VIDEO: अनिल कपूरनं सांगितली ‘अ‍ॅनिमल’ मधील बलबीर सिंगची खास गोष्ट!

शाहरुख खान स्टारर या चित्रपटाची टक्कर प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाशी होणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत आहेत. ‘डंकी’ 21 डिसेंबरला तर ‘सालार’ 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाच्या ड्रॉप 1, 2, 3, 4 नंतर, ड्रॉप 5 रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ‘ओ माही ओ माही’ गाण्याचा टीझरचा व्हिडिओ शाहरुखने शेअर केला असून सोबतच त्याने ‘डंकी’चा खरा अर्थही सांगितला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube