Download App

शिवभक्तांसाठी पर्वणी! महाशिवरात्रीला बघता येणार देशभरातील ज्योतिर्लिंग आरती… जाणून घ्या सविस्तर

Jyotirlinga Aarti भक्तांना महाशिवरात्रीचा असामान्य आणि खोलवर स्पर्श करणारा अनुभव देण्यास जिओहॉटस्टार सज्ज आहे.

  • Written By: Last Updated:

Jyotirlinga Aarti seen across country on Mahashivratri on JioHotstar : राष्ट्रीय, फेब्रुवारी २५, २०२५: महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून भक्तांना महाशिवरात्रीचा असामान्य आणि खोलवर स्पर्श करणारा अनुभव देण्यास जिओहॉटस्टार सज्ज आहे. हा पवित्र सण देशभरात किती भव्यतेने साजरा केला जातो याचे दर्शन हा कार्यक्रम घडवणार आहे.

धक्कादायक! दोन इंटर्नशिपसाठी आले 1200 अर्ज; नामांकित कंपनीच्या सीईओंनी दिला मोठ्या संकटाचा इशारा

महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट हा अशा प्रकारचा पहिलाच बहुस्वरूप, बहुस्थळीय, अनेक ठिकाणांहून स्ट्रीम होणारा कार्यक्रम एका दैवी सादरीकरणाद्वारे संपूर्ण देशाला एकत्र आणण्याची ग्वाही देतो. यामध्ये देशभरातील ज्योतिर्लिंगांवर होणाऱ्या २० हून अधिक आरत्यांचा थेट (रिअल-टाइम) अनुभव भक्तांना घेता येईल आणि घरबसल्या या सर्व उत्सवांमध्ये सहभागी होता येईल.

शिर्के खरचं गद्दार होते? इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले होते?

वेगवेगळ्या स्ट्रीमिंग्जवरून थेट प्रक्षेपण होणार असल्याने सर्व ज्योतिर्लिंगांवरील २०हून अधिक आरत्यांमध्ये प्रेक्षक रिअल-टाइम सहभाग घेऊ शकतील. देशभरात होणारे महाशिवरात्रीचे उत्सव त्यांना त्यांच्या हातातील उपकरणाद्वारे बघता येतील. त्यांना या आरत्यांचे महत्त्वही समजून घेता येईल आणि या प्रथांचा अर्थ खोलवर जाऊन समजून घेता येईल. जिओहॉटस्टारने इशा फाउंडेशनमधील उदात्त विधींचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी त्यांच्याशी सहयोग केला आहे. यामध्ये कलावंतांच्या सांगितिक सादरीकरणांच्या वैविध्यपूर्ण मालिकेचा समावेश आहे.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रात्रभर चालणारा हा उत्सव त्यामुळे देशभरात पोहोचणार आहे. यामध्ये सद्गुरूंच्या ध्यानधारणेचा व उपदेशांचा समावेश आहे. या लाइव्ह सोहळ्यामध्ये भगवान शिवाला समर्पित व त्यांच्यापासून प्रेरित सादरीकरणांचाही समावेश असेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी भरगच्च असे सांगितिक सादरीकरण रात्रभर चालू राहील. याचे नेतृत्व लोकप्रिय गायिका, गीतकार व संगीतकार सोना मोहपात्रा करतील. या प्लॅटफॉर्मवरील सोहळ्यांमध्ये द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या थेट ध्यानधारणेचाही समावेश असेल.

पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी…” गीताला जाहीर

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही ध्यानधारणा केली जाईल. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव अधिक सघन करण्यासाठी प्रेक्षक ‘देवो के देव… महादेव’ची जादू पुन्हा अनुभवू शकतील. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मिलनाची कहाणी दाखवणारा तीन तासांचा विशेष भाग महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिव-पार्वतीला वंदन करण्याच्या हेतूने प्रसारित केला जाईल. जिओहॉटस्टार देशभरातील महाशिवरात्रीच्या परंपरा एका अखंडित व खिळवून ठेवणाऱ्या पद्धतीने प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, त्यामुळे समुदायातील संबंध अधिक खोलवर जोपासले जातात. सामुदायिक सहभागातील एकमेकांच्या साथीने साजरे केले जाणारे क्षण अधिक उंचीवर नेण्यासाठी कस्टमाइझ्ड एकात्मीकरणे, गुंतवून टाकणारे कथाकथन आणि रिअल-टाइम संवाद हे सर्व एकत्र आणले जाईल.

मंत्री बेफिकीर आणि अधिकारी सैराट, प्रशासन जनतेची कामेच करत नसल्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

जिओहॉटस्टारचे प्रवक्ता या उपक्रमाबद्दल म्हणाले, “बीज पेरणाऱ्या सांस्कृतिक क्षणांचा अनुभव घेण्याची भारतातील पद्धत आम्ही नव्याने विकसित करत आहोत. यासाठी उपलब्धता, प्रमाण व प्रभाव यांच्यातील अडथळे आम्ही दूर करत आहोत. ‘महाशिवरात्री’ लाइव्ह सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही डिजिटल नवोन्मेषाचा लाभ घेत शतकानुशतके चालत आलेल्या परंपरांचे रूपांतर एका सर्वव्यापी आणि अंत:प्रेरणाधारित राष्ट्रीय अनुभवामध्ये करत आहोत. समुदायांच्या एकत्रित अनुभवांतील शक्ती खुली करण्याची आमची इच्छा आहे आणि महाशिवरात्रीचे क्षण कोट्यवधी लोकांनी एकमेकांसोबत साजरे करावे असे आम्हाला वाटते.”

पाकिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत… महाशिवरात्रीला जगातील ‘या’ 7 मंदिरांत प्रचंड गर्दी; पूजेची वेळ, विधी वाचा सविस्तर

इशा फाउंडेशनचे संस्थापक सदगुरू या सहयोगाबद्दल म्हणाले, “महाशिवरात्र हे आतमध्ये डोकावण्याचे, विचार करण्याचे आणि दिव्यत्वाशी जोडून घेण्याचे निमित्त आहे. ही रात्र अमाप ऊर्जेची असते, आयुष्याच्या सर्व क्षेत्रांतील भक्त या रात्री एकत्र येतात. जिओहॉटस्टारच्या माध्यमातून या शक्तिशाली रात्रीचा अनुभव अधिकाधिक लोकांना घेता येणार आहे, यात तंत्रज्ञान अंतर भरून काढणार आहे, तर अध्यात्म आपणा सर्वांना एकत्र आणणार आहे.”
तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा सुरेख मेळ साधत जिओहॉटस्टार देशभरात कोठूनही महाशिवरात्रीच्या उत्सवाचा अनुभव घेण्याचा आयुष्यभर स्मरणात राहणारा अनुभव देऊ करत आहे. प्रेक्षक या विधींमध्ये अखंडितपणे सहभागी होऊ शकतात आणि हा जादूई अनुभव जगू शकतात, या भव्य उत्सवात सहभागी होणे आजवर कधीही नव्हते तेवढे सोपे झाले आहे.

follow us