पाकिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत… महाशिवरात्रीला जगातील ‘या’ 7 मंदिरांत प्रचंड गर्दी; पूजेची वेळ, विधी वाचा सविस्तर

Mahashivratri Celebration In Shiv Temples : संपूर्ण जगभरात उद्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री (Mahashivratri 2025) साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा, आराधना केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा (Shiv Temples) ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. तर आणखी एका कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेलं विष प्राषन करून सृष्टीचे रक्षण केलं होतं.
महाशिवरात्रीचा मुहूर्त उद्या म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजून 47 मिनिटांपासून ते सकाळी 9 वाजून 42 मिनिटांपर्यंत त्यानंतर सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत जलाभिषेकाचा मुहूर्त (Shiv) आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजून 25 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 8 मिनिटांपर्यंत (Mahashivratri) आणि रात्री 8 वाजून 54 मिनिटांपासून ते रात्री 12 वाजून 1 मिनिटांपर्यंत देखील शुभ मुहूर्त आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी?
महाशिवरात्री दिवशी ब्रह्म मुहूर्तावर प्रथम स्नान करावे. त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी भगवान शिवचा पाणी आणि पंचामृतानं अभिषेक करावा. त्यानंतर अक्षता, पान, सुपारी, चंदन, लवंग, वेलची, भस्म, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा, सफेद फूल देवाला अर्पण करावे. शिव लिंगासमोर धूप, दीप लावून आरती करावी. सोबतच महादेवाच्या स्तोत्रांचं आणि मंत्राचं पठण करावं.
खुशखबर! सरकारी कर्मचारी मालामाल होणार; DA थेट 53 टक्क्यांवर, ‘या’ 7 महिन्यांचा सुद्धा पगार मिळणार
महाशिवरात्री केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानसह जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या खास दिवशी शिवभक्त मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने पूजा करतात. या दिवशी दूरदूरचे लोक भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरांमध्ये येतात.
पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकेत अशी अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत, जिथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी करतात. यातील काही मंदिरे हजारो वर्षे जुनी आहेत. ती भारतीय संस्कृतीशी खोलवर जोडलेली आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी जमणाऱ्या या खास सात मंदिरांविषयी जाणून घेऊ या.
वरुण देव मंदिर
पाकिस्तानातील कराचीपासून काही अंतरावर असलेल्या मनौरा बेटावर भगवान शिवाचे एक ऐतिहासिक मंदिर आहे. याला ‘मनौरा शिव मंदिर’ आणि वरुण देव मंदिर असेॉंही म्हणतात. हे मंदिर प्राचीन काळात बांधले गेलं होतं. ते हिंदू भाविकांसाठी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. अशी मान्यता आहे की, हे मंदिर समुद्राचे देव वरुण आणि भगवान शिव यांच्या पूजेला समर्पित आहे. महाशिवरात्रीच्या वेळी येथे विशेष प्रार्थना केली जाते. या मंदिरात पाकिस्तानच्या विविध भागांतून हिंदू भाविक येतात. वेळेनुसार या मंदिराची अवस्था बरीच जीर्ण झालीय, परंतु त्याचं धार्मिक महत्त्व कमी झालेलं नाही.
रात्रीस खेळ चाले! हो, बावनकुळेंना भेटलो; जयंत पाटलांनी उलगडली 25 मिनिटांच्या भेटीची ‘स्क्रिप्ट’
कटासराज मंदिर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेले कटासराज मंदिर शिवभक्तांसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. असं सांगितलं जातं की, जेव्हा माता सतीचा मृत्यू झाला तेव्हा हे मंदिर भगवान शिवाचे अश्रू ज्या ठिकाणी पडले, त्या ठिकाणी बांधले गेलं. हे मंदिर एका विशाल संकुलात वसलेले आहे, ज्यामध्ये अनेक लहान आणि मोठी मंदिरे आहेत. महाशिवरात्रीच्या वेळी, मोठ्या संख्येने हिंदू भाविक येथे जमतात आणि शिवलिंगाचा जलाभिषेक करतात. पाकिस्तान सरकार या मंदिराला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न करतंय.
गौरी मंदिर
सिंध प्रांतातील थार भागात स्थित, गौरी मंदिर भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित आहे. हे मंदिर सुमारे 300 वर्षांपूर्वी बांधले गेले. मंदिराची वास्तुकला राजस्थानी शैलीचे प्रतिबिंबित करते, ती त्याला आणखी खास बनवते. महाशिवरात्री दरम्यान येथे विशेष पूजा आणि भजन-कीर्तनाचे आयोजन केलं जातं. हे मंदिर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू भाविकांसाठी अतिशय पवित्र स्थान मानलं जातंय.
पशुपतिनाथ मंदिर
नेपाळची राजधानी काठमांडू येथे असलेले पशुपतिनाथ मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. हे दक्षिण आशियातील सर्वात पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक येथे जमतात. नेपाळ सरकार या दिवशी विशेष व्यवस्था करते. मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात. पशुपतिनाथ मंदिराला शिवभक्तांसाठी स्वर्ग असंही म्हटलं जातं. केवळ नेपाळमधूनच नाही तर भारत आणि इतर देशांमधूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात.
गोरखनाथ मंदिर
काठमांडूमध्ये असलेले गोरखनाथ मंदिर शिवभक्तांसाठी खूप महत्वाचं आहे. हे मंदिर नाथ पंथाचे मुख्य संत असलेल्या भगवान शिवाचे अवतार गोरखनाथ यांना समर्पित आहे. महाशिवरात्रीनिमित्त येथे विशेष पूजा आणि भजन-कीर्तनाचे आयोजन केलं जातं. या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे, कारण नेपाळच्या राजांनीही त्याची पूजा केली होती.
त्रिंकोमाली कोनेश्वरम मंदिर
श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे असलेले कोनेश्वरम मंदिर हे भगवान शिवाच्या मुख्य मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर हिंद महासागराच्या काठावर एका टेकडीवर वसलेले आहे, जे त्याचे सौंदर्य आणखी वाढवते. अशी मान्यता आहे की, हे मंदिर हजारो वर्षे जुने असून रामायण काळाशी संबंधित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक येथे येतात. येथे एक भव्य उत्सव आयोजित केला जातो.
श्री कैलावसनाथन स्वामी देवस्थानम
श्री कैलावसनाथन स्वामी देवस्थानम कोविल हे श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील भगवान शिव यांचं एक भव्य मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात हिंदूंची मोठी गर्दी असते. येथे भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेषतः रात्रभर जागरण देखील आयोजित केलं जातं. हे मंदिर तमिळ हिंदू परंपरेनुसार चालवले जातं. स्थानिक लोकांव्यतिरिक्त, परदेशी भाविक देखील येथे भेट देण्यासाठी येतात.