Mahadev: महाशिवरात्री निमित्त अंकुश चौधरीकडून नव्या चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष

Mahadev: महाशिवरात्री निमित्त अंकुश चौधरीकडून नव्या चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष

Ankush Chaudhari Mahadev Movie Poster : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकतो. अंकुशनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Marathi Movie) चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा अंकुश हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. आता लोखंडे दिग्दर्शित ‘महादेव’ (Mahadev Movie) चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swami Motion Pictures (@swami_motion_pictures)


महाशिवरात्रीचे (Mahashivratri) औचित्य साधत स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित ‘महादेव’ चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. महादेवाच्या मंदिरात या चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी ‘महादेव’मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अंकुश चौधरी, दिग्दर्शक तेजस लोखंडे, संगीतकार अमितराज, पंकज पडघन, निर्माते जान्हवी मनोज तांबे, प्रतीक्षा अमर बंग आणि माधुरी गणेश बोलकर उपस्थित होते.

संदीप दंडवते लिखित या चित्रपटाचे संदीप बाबुराव काळे, अमेय संदेश नवलकर (शुभारंभ मोशन पिक्चर्स) सहनिर्माते आहेत. मोशन पोस्टरमध्ये अंकुश चौधरीच्या हातात डमरू आणि नजरेत क्रोध दिसत असून यात महादेवाचे कोणते रूप पाहायला मिळणार आहे, हे येत्या काळात कळेल.

Tejaswini Pandit : अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त चाहत्यांना गोड सरप्राईज, केली नव्या सिनेमाची घोषणा

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणतात, ” आजच्या शुभदिनी आम्ही या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असून अंकुशसारखा अष्टपैलू अभिनेता यात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आधी कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारणार आहे. सध्या तरी चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. परंतु ‘महादेव’मध्ये प्रेक्षकांना फॅन्टॅसी, ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube