Download App

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीनने शेअर केला भाईजानचा जुना व्हिडीओ; म्हणाली, ‘आपण इतके तरुण…’

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन म्हणून अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ओळखली जाते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी सोशल मीडियावरील (Social media) बिनधास्त वक्तव्यामुळे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.  तसेच अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर अनेक जुने व्हिडीओ शेअर (Video share) करत असते.


आता तिने सलमान खान (Salman Khan) म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजान (Bhaijaan) टीव्ही रिअॅलिटी शो ‘दस का दम’मधील एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना कंगनाने भाईजानला तरुण दिसण्यावर कमेंट केली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने ड्रेसवर लेहेंगा घातला असल्याचे दिसून येत आहे.

ती हे करत असताना चाहते तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि भाईजान म्हणतो की, ‘टाळ्या वाजवा..किती स्पोर्टिंग.’ त्यानंतर कंगना आणि भाईजान माधुरी दीक्षितच्या “धक धक करने लगा” या गाण्यावर डान्स करत असताना दिसून आली आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना कंगनाने लिहिले आहे की, “देवा!!! भाईजान आपण इतके तरुण का दिसत आहे?? याचा अर्थ आपण आता नाही आहोत?” असं म्हणत तिने हसणारे इमोजी टाकले आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

हा व्हिडीओ कंगनाच्या एका चाहत्याने कॅप्शनसह पोस्ट केला आहे, ‘जेव्हा भाईजानने कंगनाला घागरा चोलीमध्ये परफॉर्म करायला लावले तेव्हा… ती धीर गंभीर भूमिकांपेक्षा बरंच काही करू शकते’ असं कॅप्शन त्या व्हिडीओला तिने दिले आहे. कंगना आणि भाईजान हे चांगले मित्र आहेत. गेल्या काही दिवसांअगोदर कंगना भाईजानची बहीण अर्पिता खान शर्माच्या ईद पार्टीत सहभागी झाली होती. भाईजान तिचा खूप चांगला मित्र असल्याचे तिने यावेळी सांगितले होते.


ती नेहमी सांगत असते. ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली होती की, “भाईजान माझा खूप चांगला मित्र आहे, त्याने पार्टीला बोलावलं आणि मी गेले. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास कंगना आता ‘इमर्जन्सी’ या सिनेमात दिसणार आहे. तर, भाईजान ‘टायगर ३’च्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us