Katrina Kaif Announces Pregnancy Shares Photo With Vicky Kaushal : बॉलिवूडमधील स्टार कपल कतरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी लवकरच आनंदाचे क्षण येणार आहेत. कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर ही आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कतरीना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत.
कतरीनाने (Katrina Kaif) पती विकी कौशलसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला (Vicky Kaushal) आहे. या छायाचित्रात ती पांढऱ्या स्लीव्हलेस ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉण्ट करताना दिसतेय. विकी कौशलने तिच्या बेबी बंपवर हात ठेवलेला (Bollywood) असून दोघेही एकमेकांना कवेत घेत हसताना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे.
या फोटोसोबत कैटरीनाने लिहिलं (Katrina Kaif Announces Pregnancy) आहे –
“आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू होणार आहे. माझं हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलं आहे.”
या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. प्रत्येकजण या स्टार कपलचे अभिनंदन करत असून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे 9 डिसेंबर 2021 रोजी लग्न झाले. त्यांचे लग्न खूप मोठ्या थाटामाटात पार पडले. हे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली आणि कतरिना आणि विकीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले. चाहत्यांना विकी आणि कतरिनाची जोडी खूप आवडते. कामाच्या बाबतीत, विकी शेवटचा ‘छावा’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता, कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले होते. तो आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे. कतरिना कैफ 2024 मध्ये ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटात दिसणार आहे.
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जिने आपल्या सौंदर्य, अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे चित्रपटप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. तिचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँग येथे झाला. लहानपणापासूनच तिला मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती, आणि तिच्या कष्टाळू प्रवासामुळे ती बॉलिवूडमध्ये स्थिर झाली.
कतरिनाने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 2003 मध्ये Boom या हिंदी चित्रपटातून केली. सुरुवातीला तिला काही अडचणींचा सामना करावा लागला, पण लवकरच Namastey London, Singh Is Kinng, Zindagi Na Milegi Dobara, Ek Tha Tiger, Dhoom 3 आणि Tiger Zinda Hai सारख्या हिट चित्रपटांमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. फक्त अभिनय नव्हे, तर तिचे नृत्य आणि विविध शैलींची सादरीकरणाची क्षमता तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी