Download App

Akshay Kumar: ‘तुम्हे थप्पड़ चाहिए…,’ अक्षयने कतरिना कैफला थेट सुनावलं, कारण काय?

Katrina Kaif On Akshay Kumar: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) ही जोडी बॉलिवूडमधील (Bollywood) टॉप जोडीपैकी एक आहे.

Katrina Kaif On Akshay Kumar: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) ही जोडी बॉलिवूडमधील (Bollywood) टॉप जोडीपैकी एक आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. कतरिना आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते, त्यामुळे दोघांनी अनेक बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकदा कतरिनाने अक्षयकडे असा हट्ट धरला होता, त्यानंतर या अभिनेत्याने असे काही बोलले होते की सर्वांनाच धक्का बसेल.


अक्षय कुमार आणि कतरिना कैफने सिंग इज किंग, नमस्ते लंडन, हमको दीवाना कर गये, सूर्यवंशम अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एकदा कतरिनाने अक्षयला सांगितले की तिला राखी बांधायची आहे. त्यानंतर अक्षयने थेट उत्तर दिले.

अक्षयने राखीसाठी नकार दिला

कतरिना कैफ एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये गेली होती. ‘तीस मार खान’च्या शीला की जवानी या गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिला अक्षयला राखी बांधायची होती पण त्याने नकार दिला. मला अक्षयला राखी बांधायची होती. तो एक असा व्यक्ती आहे ज्याचा मी खूप आदर करते आणि त्याला माझे स्वतःचे समजते. मला यात काही चुकीचे वाटले नाही म्हणून मी त्याला विचारले. मी विचारले- मी तुला राखी बांधू शकते का? यावर अक्षयने मला थेट सुनावलं होत. म्हणाला की, कतरिना, काय, तुला एक थप्पड हवी आहे?

Katrina Kaif Pregnancy: कतरिना खरंच प्रेग्नंट? विकीने स्पष्ट सांगितले; म्हणाला, ‘गुड न्यूजची…’

अर्जुन कपूर पळून गेला

कतरिना पुढे म्हणाली की, मला अर्जुन कपूरला राखी भाऊ बनवायचे होते. जेव्हा अक्षयने मला नकार दिला तेव्हा मी खूप निराश झाले होते. मी रात्री पार्टीला जात होते. त्याच क्षणी अर्जुन माझ्या समोर आला. तो खूप गोंडस होता. तो इतका गोड होता की मी त्याला देखील लगेच म्हणाले की, तू माझा राखी भाऊ होणार आहेस. हे ऐकून अर्जुन तिथून पळत सुटला आणि दाराबाहेर गेला. दुसऱ्या दिवशीही मी त्याचा पाठलाग केला असता तो पळून गेला होता.

follow us