Katrina Kaif Pregnancy: कतरिना खरंच प्रेग्नंट? विकीने स्पष्ट सांगितले; म्हणाला, ‘गुड न्यूजची…’
Katrina Kaif Pregnancy Rumours: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या ‘बॅड न्यूज’ (Bad News) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच तो अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटच्या (Radhika Merchant) लग्नात दिसला होता. यावेळी तो पत्नी कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) दिसला. लग्नात कतरिना लाल रंगाच्या साडीत दिसली होती. कतरिनाच्या दिसण्याने पुन्हा एकदा तिच्या प्रेग्नेंसीबाबत चर्चाना उधाण आले आहे. आता ‘बॅड न्यूज’च्या प्रमोशनदरम्यान त्याने या अफवांवर प्रतिक्रिया दिली.
View this post on Instagram
विकी कौशल स्पष्टचं सांगितले
विकीला विचारण्यात आले की कतरिनाचा वाढदिवस (16 जुलै) आणि ‘गुड न्यूज’ संदर्भात काय योजना आहेत? तर यावर तो स्पष्टचं म्हणाला की, ‘धन्यवाद! कतरिनाचा वाढदिवस खूप खास आहे. आम्ही एकत्र वेळ घालवू अशी योजना आहे. कारण प्रमोशन खूप दिवसांपासून सुरू आहे आणि कतरिनाही प्रवास करत आहे. आणि जेव्हा तुम्ही बोललेली चांगली बातमी येईल, तेव्हा आम्हाला ती सर्वांसोबत शेअर करायला खूप आनंद होईल. तोपर्यंत त्यात तथ्य नसून या केवळ चर्चा आहेत.
विकी आणि कतरिनाचे लग्न कधी झाले?
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी झाले होते. हे लग्न त्यांनी सवाई माधोपूर राजस्थानमध्ये केले. त्यांचा विवाह अत्यंत साध्या सोहळ्यात पार पडला. लग्नात फोनबाबतही कडक धोरण होते. तरीही त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. कतरिनाने सब्यसाचीचा लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
Vicky Kaushal: शूटिंग दरम्यान सेटवर अभिनेत्याला झाली दुखापत, आता घेतोय अशी काळजी
कामाच्या आघाडीवर, विकी कौशल ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चाहत्यांना चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला असून गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘तौबा तौबा’ या गाण्यातील विकीच्या डान्स मूव्ह्स व्हायरल झाल्या होत्या.