Vicky Kaushal: शूटिंग दरम्यान सेटवर अभिनेत्याला झाली दुखापत, आता घेतोय अशी काळजी

Vicky Kaushal: शूटिंग दरम्यान सेटवर अभिनेत्याला झाली दुखापत, आता घेतोय अशी काळजी

Vicky Kaushal Injury: चित्रपटाच्या सेटवर स्टंट सीन शूट करताना अनेकदा बॉलिवूड (Bollywood) कलाकार जखमी होतात. यापूर्वीही अनेक कलाकार जखमी झाले आहेत. आता सेटवर जखमी होणाऱ्या स्टार्सच्या यादीत विकी कौशलचेही नावाची भर पडली आहे. सॅम बहादूर अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी ‘छावा’ (Chhaava Movie) या चित्रपटाच्या सेटवर एका सीनच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे.

विकी कौशलच्या हाताला दुखापत : विकी कौशल ‘छावा’साठी जबरदस्त ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता. यादरम्यान तो जखमी झाला. अभिनेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, विकीच्या डाव्या हाताला प्लास्टर बांधलेला दिसत आहे आणि तो त्याच्या कारमधून बाहेर पडून त्याच्या घराकडे जाताना दिसत आहे. अभिनेता आता पुढील काही आठवडे विश्रांती घेऊन हाताची काळजी घेणार असल्याचे बोलले जात आहे. बरा झाल्यानंतर तो पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Crazy 4 Bollywood (@crazy4bolly)


विकीच्या हाताला फ्रॅक्चर पाहून चाहते नाराज: अभिनेत्याच्या हातावर प्लास्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत आणि त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

“सेटलमेंट होईपर्यंत यायचं नाही” : गायक सुरेश वाडकर यांना धमकावत 20 कोटींच्या खंडणीची मागणी

‘छावा’मध्ये विकी मुख्य भूमिकेत : विकी कौशल नुकताच ‘सॅम बहादूर’मध्ये दिसला होता. अभिनेत्याच्या या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि विकीच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. आता विकी छावा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच विकीने इंस्टाग्रामवर पडद्यामागील त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट ‘छावा’ची झलक शेअर केली आहे. ‘छावा’ हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नाटक आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत असून रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी येसूबाई भोसलेची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि नील भूपालम यांच्याही भूमिका आहेत ज्यांनी मुघल राजपुत्राची भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज