Download App

Ketaki Chitale : ‘आमचे देव हिंदू…’, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर केतकी चितळेची संतप्त पोस्ट व्हायरल

Ketaki Chitale : राहुल गांधी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावर केतकी चितळेनी ( ketaki chitale) संताप व्यक्त केला आहे.

Ketaki Chitale On Rahul Gandhi: नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत तिचं मत व्यक्त केलं आहे. मात्र आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांवर अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) जोरदार हल्लाबोल केला आहे.


काय आहे केतकीची पोस्ट?

केतकीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तिने पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘आज राहुल गांधी यांनी संसेदत जो हिंसक आहे तो कधीच हिंदू होऊ शकत नाही, असं म्हटलं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, आमचे सर्व देव-देवता हिंदू नाहीत? ते सनातनी नाहीत? त्यांनी राक्षसांना मारलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कालीमाता जिची आपण पूजा करतो, जिला शक्तीच्या रुपात पुजलं जातं, ती सनातनी नाही का? असा सवाल अभिनेत्रीने यावेळी उपस्थितीत केला आहे.

पुढे तिने सांगितले आहे की, ‘शिवजींचा एक फोटो घेऊन ते म्हणतात की, शिवजींनी असं सांगितलं आहे की, घाबरु नका. हे शिवजींनी कधी म्हटलं. संपूर्ण हिंदू समाजाचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करत आहात, तेव्हा हे सगळं चालतं का? तिचे पश्चिम बंगलामध्ये टीएमसीच्या आमदार एका महिलेला मारहाण होत असताना सरळ सांगितले की, मुस्लिम राष्ट्रात अशा गोष्टी चालत असतात. मुस्लिम राष्ट्र? आणि जर आम्ही हिंदुराष्ट्राची मागणी केली तर तुम्ही आम्हाला भगवे दहशतवादी म्हणणार का? हे सगळं चालतं, कारण आम्ही सनातनी झोपून आहोत, आम्ही कधीच जाग येणार नाही. असा हल्लाबोल अभिनेत्रीने यावेळी केला आहे.

 

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलत असताना सांगितले आहे की, ‘नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी सांगितले की हिंदुस्ताननं कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असं सांगितले आहे.

follow us