Ketaki Chitale: केतकीच्या ‘तुरुंगातील प्रवासावर’ प्रकाशित होणार पुस्तक? नेमकं काय घडलं होतं…
Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते, तसेच ती सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यावर आपली परखड मत मांडत असते. (Ketaki Chitale Book Launch) गेल्यावर्षी केतकी एका आक्षेपार्ह पोस्टमुळे चांगलीच अडचणीत आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल तिनं पोस्ट केली होती. या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिला ४१ दिवसाचा तुरुंगवास भोगला होता.
View this post on Instagram
आता या तुरुंगवासाच्या प्रवासावर केतकीनं एक पुस्तक लिहिले आहे. केतकीचं हे पुस्तक पुढच्या वर्षी प्रकाशित होणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. याबद्दलची माहिती तिनं स्वतः इन्स्टाग्रामच्या लाईव्ह (Instagram Live) माध्यमातून दिली आहे. काल रात्री केतकीने अनेक मुद्द्यांविषयी बोलण्यासाठी लाईव्हला आली होती. यामध्ये मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करा, मतदान करा. युसीसीविषयी तुमचं मत मांडा. एपिलेप्सी कम्युनिटीमध्ये असलेला आकाश दीक्षित हा कशाप्रकारे फसवणूक करत आहे, अशा अनेक मुद्द्यांवर केतकी इन्स्टाग्रामवर लाईव्हवर येऊन सांगत होती.
यावेळी तिने एका चाहत्याला उत्तर देत असताना पुढच्या वर्षीय माझ्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचे सांगितले आहे. एका चाहत्याने तिला विचारलं होतं की, “तुझी नेमकी स्टोरी काय?” यावर उत्तर देत असताना केतकी म्हणाली आहे की, “पुढच्या वर्षी माझं पुस्तक प्रकाशित होणार आहे. तर जरुर विकत घ्या. तुम्हाला माझं संपूर्ण आयुष्यबद्दल नाही, परंतु तुरुंगात जायचा प्रवास आणि का? याच्या पाठीमागील कारण नक्की कळेल. पुढच्या वर्षी ते पुस्तक प्रकाशित होणार आहे. माझ्याविषयी नेमकं काय घडलं? यावर पुस्तकात लिहिण्यात आले आहे.
Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल
पण जेव्हा हा पुस्तक प्रकाशित होईल तर तेव्हा तो जरूर विकत घ्या. केतकी चितळे सध्या मनोरंजनसृष्टीपासून खूप दूर झाली आहे, तरी सोशल मीडियावर ती प्रसिद्ध आहे. स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड’, झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ अशा लोकप्रिय सीरियलमध्ये केतकीनं रंजक असे काम केलं होतं. तसेच तिनं हिंदीमधील सोनी टीव्हीवरील ‘सास बिना सुसराल’ या सीरियलमध्ये देखील काम केलं होतं.