‘Khupte Tithe Gupte’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी केली अजित पवारांची मिमिक्री, प्रोमो व्हायरल…

Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte ) या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कलाकारांसह राजकीय नेते (political leaders) देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत. या शोचे काही प्रोमो व्हिडीओ (Promo video) सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 22T163022.940

Khupte Tithe Gupte

Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte ) या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कलाकारांसह राजकीय नेते (political leaders) देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत. या शोचे काही प्रोमो व्हिडीओ (Promo video) सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या शोच्या दुसऱ्या सीझनमधील एक नवा प्रोमोचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या या प्रोमो व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांवर जोरदार टीका करताना दिसून आले आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये राज ठाकरेंना अजित पवारांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. एकदा इलेक्शनमधून बाहेर पडल्यावर १४ आमदार निवडूण आणले. की सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले,” असं अजित पवार व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. यावर राज ठाकरे अजित पवारांची मिमिक्री करत “ए गप रे…असं मी म्हणणार होतो,” असे भन्नाट उत्तर देताना दिसून आले आहेत.

Kushal Badrike: ‘तू परत येशील तेव्हा…’ अमेरिकेला निघालेल्या बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचं तरी काय होणार? असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना जोरदार टोलेबाजी केली आहे.‘खुपते तिथे गुप्ते’चा हा नवा प्रोमो व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत येत आहे. ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा शो चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होणार आहेत.

Exit mobile version