Kili Paul Sings Gulabi Sadi Song: सोशल मीडियावर (social media) सध्या कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. पण सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे की, एखादी सर्वसामान्य व्यक्ती देखील एका रात्रीत स्टार होते. पण ज्या प्रकारे त्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळत असते, तितकीच ती प्रसिद्धी गमावण्याची देखील सोशल मीडियामध्ये मोठी ताकद आहे. सध्या सर्वच सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) माहिती आहे. टांझानियाच्या (Tanzania) किली पॉलचे प्रत्येक व्हिडीओ हे अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत असतात. सध्या संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi Song) या गाण्याने सर्वांनाच वेडं लावलं आहे.
एवढंच नाहीतर अभिनेत्री माधुरीपासून ते रेमो डिसुझा यांच्यासह अनेक कलाकारांना या गाण्याची भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यावर अनेक जण रील करताना पाह्यला मिळत आहेत. अशातच आता टांझानियाच्या किली पॉलच्या व्हिडीओने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने चक्क ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये किली पॉल चारचाकी वाहन चालवत असल्याचे दिसत आहे. ही गाडी चालवताना तो गुलाबी साडी मराठी गाणे गाताना शूट करत आहे. ते पाहून अनेकांची संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याला गाडी चालवताना शूट करु नकोस, असा सल्ला देखील दिल्याचे पाह्यला मिळाले आहे. तर काहींनी त्याने मराठी गाणे गायले म्हणून तोंडभरून कौतुक देखील केले आहे.
Ahaan Panday कडून बॉलिवूडमध्ये लॉंच करणाऱ्या मोहित सुरीला खास शुभेच्छा!
किली पॉलने याआधी देखील अनेक मराठी गाण्यांवर रील व्हिडिओ बनवले आहेत. बहरला हा मधुमास गाण्यावरील त्याचा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय ठरला होता. त्यावेळेस देखील तो असाच चर्चेत आला होता. किली पॉल हा रील स्टार आहे. अनेक बॉलिवूड गाण्यांवर व्हिडिओ बनवत तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.