Swapnil Joshi: म्हणून स्वामींचं महत्त्व खूप आहे… अभिनेता रमला स्वामींच्या निस्सीम भक्तीत

Swapnil Joshi: म्हणून स्वामींचं महत्त्व खूप आहे… अभिनेता रमला स्वामींच्या निस्सीम भक्तीत

Swapnil Joshi On Swami Samarth: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी (Swapnil Joshi )ओळखला जातो. स्वप्निल त्याच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडिया (Social media) पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. नुकताच स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला अभिनेता- निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी भक्त आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याने त्याचा सोशल मीडियावर स्वामीचा एक मन प्रसन्न करणारा व्हिडिओ (Video) शेअर केला यातून स्वप्नील स्वामींचा निस्सीम भक्त आहे हे दिसून येत.

 

View this post on Instagram

 

A post shared by स्वप्नील जोशी (@swwapnil_joshi)


स्वप्नील सोबतीने त्याचा घरी सगळेच स्वामींचे भक्त आहे आणि त्याची ही भक्ती या व्हिडिओ मधून दिसून येते. सध्या स्वप्नील त्याचा निर्मिती असलेला “नाच गं घुमा ” चित्रपट प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. बॅक टू बॅक कामाची रांग असताना स्वप्नील कामाच्या सोबतीने वैयक्तिक आयुष्य देखील तितक्याच चोखरित्या त्यांचा समतोल साधून काम करतोय. ही तारेवरची कसरत करत स्वप्नील 2024 वर्षात नवनवीन प्रोजेक्ट्स करण्यासाठी जोरदार तयारी करतोय.

स्वप्नील या बद्दल बोलताना म्हणतो ” स्वामीच माझ्या आयुष्यात खूप जवळच स्थान आहे. स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असच कायम ते आपल्या सगळ्यांचं पाठीशी भक्कमपणे उभे आहे. स्वामीच स्मरण हे खूप सकारात्मक ऊर्जा देऊन जात आणि म्हणून किती ही कामात असलो कितीही अडचणी आल्या तरी स्वामी कायम सोबत आहे ही भावना मनात असते. कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वामीच बोलावणं आलं की अक्कलकोट ची वाट दिसते स्वामीच सुंदर दर्शन होतं आणि यातून अजून जास्त काम करण्याची प्रेरणा मिळते. ”

‘जुनं फर्निचर’ चित्रपटातील ‘काय चुकले सांग ना ?’ मनाला भिडणारे गाणे प्रदर्शित

स्वप्नीलची भक्ती ही सगळ्यांनी पाहिली आहे. काम आणि घर दोन्ही गोष्टीची योग्य सांगड घालून स्वप्नील सगळचं उत्तमपणे निभावून घेतोय. 2024 वर्ष हे त्याच्या साठी खूप जास्त खास आहे कारण तो अभिनयाच्या सोबतीने निर्माता सुद्धा झाला आहे आणि आगामी काळात तो अनेक मनोरंजन प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज