Kiran Mane On CM Eknath Shinde: गेल्या काही दिवसांत देशामध्ये महिलावर लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Badlapur Sexual Assault) कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर (Kolkata Sexual Assault) आता बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सर्वच स्तरातून जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी या घटनेविषयी सोशल मीडियावरुन त्यांचं मत मांडताना दिसत पाहायला मिळत आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडेतोड टीका केली आहे.
मराठमोळा अभिनेता किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट CM शिंदे यांच्या भाषणाचा संदर्भ देत सडेतोड टीका करत फटकावलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना सांगितले आहे की, “चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. CM यांच्या या वक्तव्यावरच अभिनेत्याने थेट आक्षेप घेतला आहे.
किरण माने यांची पोस्ट
मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, “चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली.” इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम ‘माणूस’ म्हणवुन घ्यायच्या लायकीचा नाही !
त्यानंतर त्यांनी आणखी एका घटनेविषयी सांगितले आहे. कराडजवळील टेंभू गांवातल्या ‘छत्रछाया’ या निराधार मुलींसाठीच्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा भयानक प्रकार उघडकीला आला आहे ! आश्रम चालवणारी समाजसेविकाच या निराधार अल्पवयीन मुलींना अनेक बड्या धेंडांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती… या सेक्स स्कँडलमध्ये अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा संशय आहे. तसेच एका मोठ्या राजकारण्याच्या भावाचाही यात समावेश असल्याची चर्चा आहे. असो. आज लाडकी बहिण योजनेच्या चकचकीत इव्हेन्टसाठी ‘चीप’ मिनिस्टर कोल्हापुरात येणार आहेत. गृहमंत्री नेहमीप्रमाणे ‘लापता’ आहेत.