Kiran Mane: …अन् माझ्या आईचं स्वप्न पूर्ण केलं; रितेश देशमुखच किरण मानेंशी खास कनेक्शन काय जाणून घ्या

Kiran Mane: मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (social media) कायमच सक्रिय असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची सतत काहीना काही माहिती आणि अनुभव फेसबूकवर (Facebook) शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.   View this post on Instagram   A post shared by Kiran […]

Kiran Mane

Kiran Mane

Kiran Mane: मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (social media) कायमच सक्रिय असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची सतत काहीना काही माहिती आणि अनुभव फेसबूकवर (Facebook) शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.


बिग बॉस (Bigg Boss) निमित्ताने माझ्यासोबत माझ्या आईचे स्वप्न पूर्ण झाल्याचे मानेंनी पोस्टमध्ये सांगितले आहे. मात्र मानेंच्या आईचं हे स्वप्न पूर्ण करण्यामागे रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) मोठा वाटा होता.


किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया जेव्हा बिग बॉसच्या घरात आले होते, त्या वेळेसचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेअर करत किरण मानेंनी रितेशचे आभार मानले आहेत.


किरण माने यांची पोस्ट
.”कधी-कधी आपल्या काळजाच्या जवळच्यांचं एखादं छोट्टंसं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो तवा जे समाधान मिळतं ते शब्दांत नाय सांगू शकत !
माझी आई रितेश देशमुखची लै मोठ्ठी फॅन ! मी एकदा तरी रितेशला भेटावं अशी तिची लै लै म्हंजी लैच इच्छा होती. ‘बिगबाॅस’नं ती इच्छा पूर्ण केली. रितेशला मी जेव्हा हे सांगीतलं तेव्हा रितेशनं मला मिठी मारून कॅमेर्‍याच्या लेन्समध्ये बघितलं आणि म्हणाला, “आईS नमस्कार.”
…घरातले सांगतात, त्यादिवशी आई खूप खुश होती !
लब्यू बिगबाॅस… लब्यू रितेश”

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

किरण मानेंच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर नुकतच ते रावरंभा सिनेमात झळकले होते. शिवाय मानेंची एक मराठी सिरीयल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तसेच ते महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमातही काम करत आहेत.

Exit mobile version