Download App

Maratha Reservation: “हे फक्त निवडणुकांसाठीचे गाजर..”, मराठा आरक्षणावर किरण माने यांची पोस्ट

Kiran Mane Post on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या देशभरात जोरदार चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आंदोलन करत आहेत. (Maratha Aarakshan) दरम्यान किरण माने यांनी लिहिलेल्या मराठा आरक्षणावर पोस्टने चाहत्यांचा लक्ष वेधून घेतलं आहे.

किरण माने यांची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post): किरण माने यांनी लिहिलं आहे, मराठा बांधवांनो, तहात हारू नका. “…सदर अध्यादेश १६ फेब्रूवारी २०२४ पासून किंवा त्यानंतर लागू होईल.” आणि “…यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील.” हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे. निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा. एक मराठा लाख मराठा….


किरण मानेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव: सरसकट मराठा जातीला आरक्षण मिळाले असते तर विजय म्हणता आले असते .. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तर आधीही आरक्षण होतेच .. मग आता वेगळे काय? लाख नोंदी मिळाल्या वगैरे झूट आहे .. सगेसोयरे बाबत काही स्पष्टता नाही .. गोंधळ व गुंतागुंत आहे.

सगेसोयरे _’फसवणूक’ करणारा नमुनेदार शासन आदेश _ “सगेसोयरे म्हणजे पितृसत्ताक पद्धती नातेवाईक _ अरे बाबा _ त्यात मातृसत्ताक कुठंय? आईच्या /बायकोच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र या आमच्या मागणीचे काय? पितृसत्ताक मधे ते बसतच नाहीत आणि हा तर प्रचलित कायदा आहेच ना.. मग हा शासन आदेश
नव्याने काढायचे थोतांड का? फसवणूक’च…

बॉबी देओलने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली भेट, साऊथच्या नवीन चित्रपटातील फर्स्ट लूक समोर

किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक मराठा लाख मराठा, महामानवाच्या दूरदृष्टीला सलाम, जय शिवराय जय भीम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज