Manoj Jarange : मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? यादीच आली समोर..

Manoj Jarange : मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? यादीच आली समोर..

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश (Manoj Jarange) मिळालं. राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून सरकारने पहाटेच अध्यादेशही काढले. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. आंदोलन काळात जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या. काल वाशी येथील जाहीर सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी (Maratha Reservation) सरकारला रात्रीपर्यंतची मुदत दिली होती. अध्यादेश काढले नाहीत तर सकाळीच मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा सरकारला दिला होता. त्यानंतर सरकारने रात्रीतून कार्यवाही करत अध्यादेश काढले.

Maratha reservation : ..तर ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल; मंत्री छगन भुजबळांना सरकारला इशारा

राज्यात ज्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यात आतापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहेत. याचा डेटा देण्याची मागणी मान्य करण्यात आली.

शिंदे समितीला सध्या दोन महिने मुदतवाढ देण्यात आली असून टप्प्याटप्प्यातत मुदतवाढ देण्यात येणार आहे.

नोंदी मिळालेल्या लोकांच्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, ही मागणी मान्य करण्यात आली.

सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही ही मागणी मान्य करण्यात आली.

राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत गृहविभाागाने पत्र देण्याची मागणी मान्य करण्यात आली

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती करायची नाही. भरती केली तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेऊन भरती करा ही मागणी मान्य करण्यात आली.

क्युरेटिव्ह पिटीशनचा मुद्दा न्यायालयात आहे. आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळणार.

महाराष्ट्रात ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी नाहीत त्या बांधवाांनी शपथपत्र करून द्यावे. यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये. ही मागणी मान्य करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज