Maratha reservation : …तर ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल; मंत्री छगन भुजबळांना सरकारला इशारा

  • Written By: Published:
Maratha reservation : …तर ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरू होईल; मंत्री छगन भुजबळांना सरकारला इशारा

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला अनेकदा अल्टिमेटम देऊनही आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं मराठा आंदोलक मुंबईत येऊन धडकले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) विनंती केली. मात्र, मुंबईत येण्यावर जरांगे ठाम आहेत. आझाद मैदानावर जाऊन घोषणा करण्याबाबत जरांगे ठाम आहेत. दरम्यान, आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली.

100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती करु नका : मनोज जरांगेंची शिंदे सरकारडे मोठी मागणी 

आज माध्यमांशी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यावं. पण, ओबीसींवर अन्याय होता कामा नये. उद्या ओबीसींवर अन्याय झाल्याचे लक्षात आले तर नक्कीच ओबीसीही आंदोलन सुरू करतील. त्यामुळे सरकारने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. आम्ही आमची मत मांडली. आम्हाला जी मतं चुकीची वाटतात त्याबद्दल आम्ही खुलेपणाने बोलतो, मतं मांडतो, असं भुजबळ म्हणाले.

गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे टपोरी लोकं, ते फक्त खोके घ्यायला…; संजय राऊतांची सडकून टीका

कायद्याच्या कक्षेत जे-जे बसेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारण आजकाल कोणीही कोर्टात जातं. त्याची चिरफाड हरोते. त्यामुळं नियमात व कायद्यात जे बसेल देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, असं माझंही म्हणणं आहे. पण, ओबीसींवर अन्याय होता कामा नये. या मतावर आम्ही ठाम आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात आज मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेत जरांगे पाटील यांची सकारात्मक भूमिका दिसून येत आहे. मराठा आरक्षणावर लवकरच तोडगा निघेल, असंही बोलल्या जातं.

मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य – केसरकर
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ३७ लाख कुणबी दाखले दिले होते. परंतु, आणखी ५० लाखांच्या वर ही संख्या जाणार आहे.

मनोज जरांगे यांना सरकारी शिष्टमंडळाने नवा जीआर दिला आहे. त्यामुळे जरांगे आता काय भूमिका घेणार? ते मुंबईतील आझाद मैदानात जाणार की वाशीतून आंदोलन मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube