Kiran Mane: ‘TDM अन् महाराष्ट्र शाहीर’ यावरून किरण मानेंची ‘ती’ पोस्ट जोरदार चर्चेत

Kiran Mane: मराठी सिनेमाना प्रेक्षक येत नाही, तसेच मराठी सिनेमाना शोज मिळत नाहीत हे मुद्दे अनेकदा उपस्थित केले जात असतात. आता सध्या ‘TDM’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हे दोन मराठी सिनेमा (Marathi cinema) खूप जोरदार चर्चेत आले आहेत. भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित ‘TDM’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. पण बऱ्याच […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 03T111139.177

Kiran Mane

Kiran Mane: मराठी सिनेमाना प्रेक्षक येत नाही, तसेच मराठी सिनेमाना शोज मिळत नाहीत हे मुद्दे अनेकदा उपस्थित केले जात असतात. आता सध्या ‘TDM’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हे दोन मराठी सिनेमा (Marathi cinema) खूप जोरदार चर्चेत आले आहेत. भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) दिग्दर्शित ‘TDM’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. पण बऱ्याच ठिकाणी टीडीएम सिनेमाचा शो कॅन्सल केले जात आहेत.


तसेच सिनेमाला प्राइम टाइम (Prime time) मिळत नसल्याची खंत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि टीमने व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना या चित्रपटातील अभिनेत्याला अक्षरशः अश्रू देखील अनावर झाले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता या मुद्द्यावर किरण माने (Kiran Mane) यांनी खंत व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.

आजपर्यंत अनेक मालिका, नाटके, सिनेमामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका साकारत किरण माने चाहत्यांच्या भेटीला येत असतो. किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने एक अनोखी ओळख दिली होती. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या शोनंतर किरण माने सतत जोरदार चर्चेत आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहेत.


सोशल मीडियावरून ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. परंतु ते नेहमी समाजातील त्यांना पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या गोष्टींविषयी भाष्य करत असताना दिसून येतात. आता सिनेमाना शो मिळत नाहीत, सिनेमाना प्रेक्षक येत नाहीत, याबाबत त्यांनी केलेली त्यांची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “अस्सल मराठी मातीतल्या ‘TDM’ला शोज मिळत नाहीत.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, कोर्टाने याचिका फेटाळली

मराठी मातीचा दरवळ देशभर पसरवणाऱ्या शाहीरांना सलाम करण्यासाठी आलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ला शोज आहेत पण प्रेक्षक नाहीत. या वेळी खऱ्या अर्थाने मराठी ‘दीन’ झाली आहे. अशी पोस्ट त्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Exit mobile version