Krishna Shroff Women Fitness Leader Of The Year Award: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता जॅकी श्रॉफ (jackie shroff) यांच्या दोन्ही मुलांची म्हणजेच टायगर श्रॉफ (Tiger shroff) आणि लेक कृष्णा श्रॉफ (krishna shroff) यांची सोशल मीडियावर (social media) चर्चा असते. टायगरने जरी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं असलं तरीदेखील कृष्णा मात्र, या लाइमलाइटपासून दूर आहे.
विशेष म्हणजे बॉलिवूडपासून दूर असूनही कृष्णा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. आता अभिनेत्रीने वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला आहे.
पुरस्कार प्राप्त करताना अभिनेत्रीने सांगितले आहे की, हा पुरस्कार माझ्यासाठी अविश्वसनीय ओळख आहे. अत्यंत पुरुषप्रधान उद्योगात (फिटनेस आणि एमएमए) मी काम करून नावलौकिक कमावलं आहे. विविध आव्हानांचे स्वागत खुल्या हातांनी करून थोडीशी जोखीम पत्करली आहे.
आता खेळ सुरु! अजय देवगण आणि आर माधवनच्या ‘शैतान’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात
इव्हेंट मधल्या या कृष्णाचा तिच्या भाषणाने अनेकांचे लक्ष वेधून घेतल आहे. कृष्णाने आपल्या देशातील तरुणांमध्ये फिटनेस लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि MMA च्या खेळावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकला आहे. दक्षिण आशियातील अग्रगण्य MMA जाहिरातींपैकी एक मॅट्रिक्स फाईट नाइट (MFN) आणि सेलिब्रिटी-आवडते जिम MMA मॅट्रिक्सची स्थापना करणाऱ्या कृष्णाने ‘वुमन फिटनेस लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला आहे.