Download App

Saif Ali Khan Health Update : सैफला बरा होण्यास..; मेडिकल बुलेटिन जारी करत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

Lilavati Hospital Doctor Reaction On Saif Ali Khan Health : अभिनेता सैफ अली खानवर गंभीर हल्ला झाला होता. त्यानंतर सैफला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल सैफवर शस्त्रक्रिया पार पडली. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते चालण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. आयसीयूमधून सैफला स्वतंत्र वार्डात शिफ्ट केलंय. सैफ अली खानला एका आठवड्याच्या विश्रांतीची गरज आहे. सैफच्या तब्येतीला (Saif Ali Khan Health Update) कोणताही धोका नसल्याचं देखील लीलावती रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केलाय. आज पत्रकार परिषदेमध्ये ते (Lilavati Hospital Doctor) बोलत होते.

लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सैफ अली खानचे हेल्थ बुलेटिन जारी केलं आहे. सैफला (Saif Ali Khan Attack) आयसीयूमधून बाहेर काढून स्पेशल रूममध्ये हलवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर सैफ रक्ताच्या थारोळ्यात रूग्णालयात आला होता. मात्र आता तो धोक्याबाहेर आहे. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. त्याला आठवडाभर विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.

VIDEO : सोनेरी डोळे अन् सावळा रंग, महाकुंभात आणखी एक ‘सुंदरी’…गर्दीचं वेधलं लक्ष

त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येतंय. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना न्युरॉलॉजिकल काही जास्त समस्या नाही. त्यांना चालवून बघितलंय. पाठीला खोल जखम आहे. त्यामधून पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सैफला विश्रांतीचा सल्ला दिलाय. अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीरज म्हणाले की, त्यांची प्रकृती आता खूपच चांगली आहे. त्यांना आयसीयूमधून एका खास खोलीत हलवण्यात आले आहे.

अभिनेता सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात चाकू मारण्यात आला होता. गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी अवस्थेत सैफला लीलावती रुग्णालयात आणण्यात आले असून शस्त्रक्रियेनंतर सैप आता धोक्याबाहेर असल्याचं समजतंय.

दिंडोरीच्या आश्रमात वाल्मिकचा मुक्काम, सीआयडी पण तिथं गेली होती : तृप्ती देसाईंचा नवा बॉम्ब

करीना कपूरनेही सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची माहिती शेअर केलीय. सोशल मीडियावर पोस्ट करत करीना कपूरने लिहिलंय की, आमच्या कुटुंबासाठी हा खूप आव्हानात्मक दिवस होता. आम्ही अजूनही गोष्टींवर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सर्व कसे घडले याबद्दल आश्चर्य वाटते. या कठीण काळात मी मीडिया आणि पापाराझींना विनंती करू इच्छितो की, कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणे कोणतेही कव्हरेज करू नका.

follow us