Download App

जूनमध्ये ओटीटीवर क्राईम आणि सस्पेन्सचा धमका, स्कूप ते ब्लडी डॅडी होणार रिलीज

List of movies and webseries releasing on OTT in the month of June : आजकाल प्रेक्षकांना घरातच मनोरंजन हवे असते. त्यांना घरबसल्या टीव्ही किंवा मोबाईलवर चित्रपट आणि मालिका बघायच्या असतात. OTT प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर, दर्शकांना अनेक चित्रपट आणि मालिका घरात बसून पाहता येतात. OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी भरपूर मेजवाणी असते. OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema, Netflix आणि Disney Plus Hotstar वर रोज काहीतरी नवीन चित्रपट, वेबसिरीज ओटीटीवर रिलीज होत असते. जून महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुहेरी डोस मिळणार आहे. काही आश्चर्यकारक चित्रपट आणि वेब सिरीज जूनमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील. अनिल कपूरपासून ते शाहिद कपूरपर्यंत, बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या वेबसिरीज आणि चित्रपट या महिन्यात OTT वर रिलीज होत आहेत. विशेषत: गुन्हेगारी आणि थ्रिलरने भरलेल्या या मालिका आणि चित्रपट तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवतील आणि तुमचे खूप मनोरंजन करतील.

https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE

असुर 2:
अभिनेता अर्शद वारसीची ‘असुर’ ही मालिका हिट ठरली होती. या वेबसिरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. तेव्हापासून प्रेक्षक या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत होते. दरम्यान, आता या मालिकेचा दुसरा सीझन १ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या हंगामाची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शनक ओनी सेन यांनी केले आहे.

स्कूल ऑफ लाईज:
‘स्कूल ऑफ लाईज’ ही वेबसिरीज 2 जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर रिलीज होणार आहे. या मालिकेत हरवलेल्या मुलाच्या शोधाची कथा दाखवण्यात येणार आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन अविनाश अरूण यांनी केले आहे. प्रेक्षक या वेबसिरीजची आतुरतनेने वाट पाहात आहेत.

द नाईट मॅनेजर 2:
अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला स्टारर ही मालिका नाईट मॅनेजर शानभोवती फिरते, जो शस्त्रास्त्र विक्रेता शैलेंद्र रुंगटाला उघड करण्याच्या मोहिमेवर आहे. या शोचा दुसरा सीझन ३० जूनपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.

कृषी विभागाचा दणका! तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; कारणे दाखवा नोटीसाही बजावल्या

स्कूप:
पत्रकाराची हत्या झाल्यानंतर एक क्राईम रिपोर्टर न्यायासाठी लढतो आणि मीडिया, पोलिस आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या विरोधात जातो. ही वेबसिरीज जिग्ना व्होरा यांच्या भायखळा : माय डेज इन प्रिझन या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगितले जाते.
दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कूप हाय ही वेबसिरीज २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत सस्पेन्स आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. ही वेबसिरीज Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
करिश्मा तन्ना ही या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

ब्लडी डॅडी
अली अब्बास जफर दिग्दर्शित या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहिद कपूर, संजय कपूर आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट ९ जून रोजी JioCinema वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच शाहित कपूर ड्रग माफीयांशी लढतांना दिसणार आहे.

Tags

follow us